अहमदाबाद: भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने पुन्हा एकदा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पिंक बॉल टेस्टसाठी वापरण्यात आलेल्या पिचवर टीक करणाऱ्यांवर निशाना साधला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीत सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशीच लागला होता. भारताने या सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला होता. दोन्ही संघातील फलंदाजांना या पिचवर धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्यानंतर या नव्या स्टेडियमच्या पिचवरून बराच वाद झाला होता. वाचा- रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रोहित मैदानावर झोपलेला दिसत आहे आणि त्यासाठी कॅप्शन लिहली आहे की, विचार करतोय की चौथ्या कसोटीसाठी कशी असेल?, रोहितची ही पोस्ट म्हणजे तिसऱ्या कसोटीच्या पिचवर टीका करणाऱ्यांना उत्तर असल्याची चर्चा सुरू आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटीत रोहितने पहिल्या डावात ६६ धावा तर दुसऱ्या डावात नाबाद २५ धावा केल्या होत्या. त्याआधी चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीत रोहितने १६१ धावा केल्या होत्या. या कामगिरीचा रोहितला आसीसीच्या कसोटी क्रमवारीत फायदा झाला. तो क्रमवारीत ८व्या स्थानावर पोहोचला. आहे. वाचा- या आधी देखील रोहितने तिसरी कसोटी सुरू होण्याआधीच पिच कसे असावे याबाबतचा वाद कसा चुकीचा हे सांगितले होते. प्रत्येक संघ घरच्या मैदानाचा फायदा घेत असते. तसे नसेल तर आयसीसीने एक नियम तयार करावा आणि भारतात आणि भारता बाहेर सारखेच पिच तयार करावे असे मत व्यक्त केले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा सामना ४ मार्चपासून अहमदाबाद स्टेडियमवरच होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uAdbeu
No comments:
Post a Comment