अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरी कसोटी झाली. या डे-नाइट कसोटीत भारतीय संघाने दुसऱ्याच दिवशी १० विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या या विजयात फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमीका पार पाडली. अक्षर पटेलने ११ तर आर अश्विनने ७ विकेट घेतल्या. इंग्लंडच्या दोन्ही डावातील १९ विकेट या दोन फिरकीपटूंनी घेतल्या. वाचा- टीम इंडियाच्या या विजयासह कर्णधार विराट कोहली()ने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. विराटसाठी हा विजय खास ठरला. भारतीय मैदानावर कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला. कसोटीत विराटच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा २२ वा विजय ठरला. हा विक्रम आतापर्यंत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी( )च्या नावावर होता. त्याने भारतात २१ कसोटीत विजय मिळून दिला होता. वाचा- विराटने धोनीचा विक्रम मागे टाकला तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार स्टीव्ह वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली. वॉने घरच्या मैदानावर २२ कसोटी सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने ५३ पैकी ३० कसोटीत विजय मिळवले आहेत. तर रिकी पॉन्टिंग ३९ पैकी २९ विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट वॉसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध २०१९मध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकून विराट धोनीनंतरचा दुसरा यशस्वी कर्णाधार ठरला होता. विराट सध्या कसोटीमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ५९ पैकी ३५ सामन्यात विजय मिळवला आहे. वाचा- कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार ग्रॅमी स्मिथ- ५३ विजय रिकी पॉन्टिंग- ४८ विजय स्टीव्ह वॉ- ४१ विजय क्लाइव्ह लॉईड- ३६ विजय विराट कोहली- ३५ विजय विराटच्या नेतृत्वात विविध देशांविरुद्ध विजय इंग्लंडविरुद्ध ७ विजय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ विजय श्रीलंकेविरुद्ध ६ विजय वेस्ट इंडिज विरुद्ध ६ विजय ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ विजय बांगलादेशविरुद्ध ३ विजय न्यूझीलंडविरुद्ध ३ विजय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P7K95H
No comments:
Post a Comment