Ads

Saturday, February 20, 2021

मुंबई इंडियनच्या खेळाडूची आयपीएलपूर्वी तुफानी फलंदाजी, चौकार आणि षटकारांचा केला वर्षाव

मुंबई : आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या धडाकेबाज फलंदाज आता चांगल्या फॉर्मात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलपूर्वी होणाऱ्या बीसीसीआयच्ये एका स्पर्धेत या खेळाडूने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावरच १४२ धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघानेही यावेळी आपल्या खेळाडूचे या धडाकेबाज फलंदाजीनंतर कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज असलेला इशान किशन सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. इशान हा झारखंडच्या संघाचा कर्णधारही आहे. इशानने आज मध्य प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात फक्त ९४ चेंडूंत १९ चौकार आणि ११ षटकारांच्या जोरावर १७३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. त्यामुळे झारखंडच्या संघाला ५० षटकांत तब्बल ४२२ धावांचा डोंगर उभारता आला आहे. इशानने ही खेळी साकारुन निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर होणार आहे. त्याच़बरोबर ट्वेन्टी-२० विश्वचषकही यावेळी भारतामध्येच खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सच्या जेतेपदामध्येही इशानचा मोठा वाटा होता. कारण गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये इशानने सर्वाधिक २९ षटकार लगावले होते. इशानने गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये १४५.७६च्या सरासरीने ५१६ धावा केल्या होत्या. इशान हा झारखंडचा कर्णधार आहे, त्याचबरोबर सलामीवीराची भूमिकाही तोच पार पडतो. त्याचबरोबर यष्टीरक्षणाची जबाबदारीही त्याच्याकडे आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील सर्वाधिक धावांच्या यादीत आता इशानचेही नाव आले आहे. इशान यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये संजू सॅमसन हा अव्वल स्थानावर आहे. संजूने या स्पर्धेत नाबाद २१२ धावांची झकास खेळी साकारली होती. झारखंडच्या डावाची सुरुवात यावेळी चांगली झाली नव्हती. कारण त्यांना पहिला धक्का लवकरच बसला होता. पण त्यानंतर इशानने दमदार फलंदाजी करत गोलंदाजांना आपल्या समोर लोटांगण घालायला भाग पाडले. इशानने यावेळी सर्व गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. त्याचबरोबर मैदानात चौफैर फटकेबाजी करत त्याने धमाकेदार दीडशतकही झळकावले. पण यावेळी द्विशतक रचण्याची त्याची संधी मात्र हुकली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dxj5qK

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...