अहमदाबाद, : नरेंद्र मोदी यांचं नाव देण्याता आलेल्या जगातील सर्वात मोठ्या मैदानातील पहिलाच कसोटी सामना दोन दिवसांतच संपल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत या मालिकेतील एकही सामना दोन दिवसांमध्येच संपलेला नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच या सामन्यात फिरकी गोलंदाजांना भरपूर मदत मिळत होती. या गोष्टीच्या जोरावरच भारतीय संघाने इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांमध्ये आटोपला होता. यावेळी भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक सहा विकेट्स मिळवल्या होत्या. आतापर्यंतच्या कसोटीमधील पटेलची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. कारण आतापर्यंत पटेलला एकदाही सहा विकेट्स पटकावता आल्या नव्हत्या. यावेळी आर. अश्विननेही तीन विकेट्स मिळवत पटेलला चांगली साथ दिली होती. भारतीय संघालाही दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी त्यांना या खेळपट्टीवर आघाडी मिळाली होती. भारताचा पहिला डाव यावेळी १४५ धावांवर आटोपला. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रुटने यावेळी सर्वाधिक पाच बळी मिळवले. रुटने यावेळी भारताचा अर्धा संघ गारद करताना फक्त आठ धावा दिल्या होत्या. त्याचबरोबर जॅक लिचने यावेळी चार विकेट्स मिळवल्या. इंग्लंडचा दुसरा डाव फक्त ८१ धावांत गडगडल्याचे पाहायला मिळाले. पटेलने यावेळी पुन्हा एकदा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली. त्याचबरोबर एका सामन्यात १० विकेट्सही त्याने मिळवल्या. त्याचबरोबर अश्विनने यावेळी चार बळी मिळवले. त्याचबरोबर अश्विनने यावेळी कसोटी कारकिर्दीतील ४०० बळींचा टप्पाही पूर्ण केला. अश्विनने यावेळी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला बाद करत कसोटी क्रिकेटमधील ४०० विकेट्स पूर्ण केल्या. त्याने या सामन्यापूर्वी ३९४ विकेट घेतल्या होता. भारताकडून कसोटीत सर्वात वेगाने ४०० विकेट घेण्याचा विक्रम आता अश्विनच्यानावाववर जमा झाला आहे. हा विक्रम यापूर्वी अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने ८५ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. मोटेरा कसोटी अश्विनची ७७वी कसोटी आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ७२ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. भारताकडून ४०० विकेट्स मिळवणारा अश्विन हा चौथा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स या कुंबळे यांच्या नावाव़र आहेत. कारण कुंबळे यांनी ६१९ विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा क्रमांक लागतो. कपिल देव यांनी आतापर्यंत ४३४ विकेट्स मिळवल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आहे. हरभजनच्या नावावर ४१७ विकेट्स आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NxC1LA
No comments:
Post a Comment