चेन्नई, : आयपीएलच्या लिलावात ज्या पहिल्या खेळाडूवर बोली लागली तो हो ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यावेळी स्मिथला आपल्या संघात दाखल करुन घेतले. यावेळी स्मिथवर किती रुपयांची दिल्लीने बोली लावली, पाहा.... स्मिथची बेस प्राइज होती ती २ कोटी. स्मिथला या किंमतीमध्येच संघात घेण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक होता. पण त्यानंतर दिल्लीच्या संघाने २ कोटी २० लाख रुपयांची बोली स्मिथवर लावली आणि त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले. आयपीएलचा लिलाव सुरु झाला तो करुण नायरपासून. पण यावेळी करुणला कोणीही संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यानंतर बोली लागलेला स्मिथ हा पहिलाच खेळाडू ठरला. या लिलावासाठी आठ संघ एकूण २९२ खेळाडूवर बोली लावतील. यापैकी १६४ खेळाडू भारतीय असतील. तर ३५ ऑस्ट्रेलियाचे, २० न्यूझीलंडचे, १९ वेस्ट इंडिजचे, १७ इंग्लंडचे, १४ दक्षिण आफ्रिकेचे, ९ श्रीलंकेचे, ७ अफगाणिस्तानचे आणि नेपाळ, युएई आणि युएसए या देशाचे प्रत्येकी १ खेळाडू आहेत. चेन्नईत होणाऱ्या या मिनी लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत हे देखील जाणून घेऊयात. या वर्षी लिलावासाठी सर्वाधिक पैसे पंजाब किंग्जकडे आहेत. पंजाबकडे ५३.२० कोटी इतकी रक्कम आहे. त्यानंतर आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडे ३७.८५ कोटी इतकी रक्कम आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे ३५.४० कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आयपीएलच्या लिलावातून आपलं नाव परत घेतलं आहे. वुडला भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. पण आता भारताविरुद्धच्या अन्य सामन्यांमध्ये मात्र वुड खेळणार आहे. पण असे असले तरी त्याने आयपीएलच्या लिलावातून मात्र आपलं नाव परत घेतलं आहे. वुडने लिलावापूर्वी आपलं नाव परत घेतल्यामुळे बऱ्याच जणांना धक्का बसला आहे. कारण वुडला लिलावात किमान दोन कोटी रुपये तरी मिळाले असते. पण यावेळी पैशाला महत्व न देता त्याने आपल्या कुटुंबियांना वेळ देण्याचे ठरवले आहे. कुटुंबियांना वेळ द्यायचा असल्यामुळे वुडने आयपीएलच्या पैशांवर पाणी फेरले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ax4QjM
No comments:
Post a Comment