जयपूर: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत एकाच पद्धतीने दोन्ही डावात शून्यावर बाद झाल्यानंतर भारतीय संघातून मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आला होता. एडिलेड कसोटीत पृथ्वी शॉच्या कामगिरीवर जोरदार टीका झाल होती. त्यानंतरच्या तीन कसोटीत पृथ्वीला संघात स्थान मिळाले नाही. फक्त ऑस्ट्रेलिया दौरा नाही तर त्याआधी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत पृथ्वी अपयशी ठरला होता. वाचा- .... वाचा- खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वीबद्दल अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. अशात देशात आजपासून सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीने दमदार कमबॅक केले. आक्रमक फलंदाजीसाठी पृथ्वी ओळखला जातो आणि तशाच पद्धतीने फलंदाजी करत पृथ्वीने धावा केल्या. वाचा- विजय हजार ट्रॉफीत दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने नाबाद १०५ धावा केल्या आणि मुंबईला शानदार विजय मिळून दिला. यामुळे स्पर्धेतील पहिल्या लढतीत विजय मिळून मुंबईने चांगली सुरूवात केली. वाचा- प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाने हिम्मत सिंहच्या १०६ धावांच्या जोरावर २११ धावा केल्या. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन शून्यावर बाद झाला. मुंबईच्या धवल कुलकर्णीने ३५ धावा देत तीन विकेट घेतल्या. त्यानंतर मुंबईने विजयाचे लक्ष्य ३१.५ षटकात ३ विकेटच्या मोबदल्यात पार केले. मुंबईची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल आठ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर पृथ्वी आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी ८२ धावांची भागिदारी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर देखील पृथ्वीने दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. त्याने ८९ चेंडूत १०५ धावा केल्या. यात १५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या. त्याने पृथ्वी सोबत ९३ धावांची भागिदारी केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aFerFb
No comments:
Post a Comment