ख्राइस्टचर्च: IPLच्या १४व्या हंगामासाठी चेन्नईत नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल सारख्या खेळाडूंना विक्रमी बोली लागली. पण असे काही खेळाडू होते ज्यांना कोणीच बोली लावली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज असलेल्या या खेळाडूंना कोणी बोली न लावल्याने सर्वांना धक्का बसला. वाचा- लिलावात बोली न लागलेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मर्यादीत षटकाचा कर्णधार एरॉन फिंचचा देखील समावेश आहे. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात फिंच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळला होता. त्याने २२.३च्या सरासरीने धावा केल्या . संपूर्ण स्पर्धेत त्याने फक्त एकदा ५०हू अधिक धावा केल्या. नुकत्याच झालेल्या बॅग बॅश लीग स्पर्धेत देखील त्याला प्रभाव पाडता आला नाही. १३ डावात फिंचने १३ डावात १३.७६च्या सरासरीने १७९ धावा केल्या. वाचा- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेच्या आधी बोलताना फिंच म्हणाला, पुन्हा आयपीएलमध्ये खेळलो असतो तर चांगले झाले असते. ही एक शानदार लीग आहे. प्रामाणीकपणे सांगायचे झाले तर माझी निवड न होणे धक्कादायक नव्हते. वाचा- .. मला क्रिकेट खेळण्यास आवडते. पण घरी थोडा वेळ घालवणे वाइट गोष्ट नाही. विशेषत: आमचा कार्यक्रम खुप व्यस्त असतो. जेव्हा आम्ही इंग्लंड दौऱ्यावर जाऊ तेव्हा क्वारंटाइनचा आणि जैव सुरक्षित वातावरणात अधिक वेळ रहावे लागले, असे फिंच म्हणाला. वाचा- मला वाटते की घरी थांबून पुन्हा एकदा चांगली तयारी होऊ शकते. माझी पत्नी निश्चिपणे आनंदी आणि उत्साही आहे, असे त्याने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qJF8OH
No comments:
Post a Comment