चेन्नई, : बंदी उठल्यानंतर श्रीशांत आता आयपीएल खेळणार असं सर्वांनाच वाटलं होते. आयपीएलच्या लिलावासाठी त्याची ७५ लाख एवढी बेस प्राइजही ठरवण्यात आली होती. पण लिलावाच्या अंतिम यादीमध्ये श्रीशांतचे नाव नव्हते. त्यामुळे श्रीशांत लिलावामध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. पण लिलावात संधी मिळाली नसली ती श्रीशांतला अजूनही आयपीएल खेळण्याची आशा आहे. श्रीशांतने यावेळी प्रीती झिंटाला नेमकं घडलं तरी काय, पाहा...लिलावासाठी पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा ही चेन्नईमध्ये आली होती. त्यावेळी प्रीतीने एक सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली होती. त्यामध्ये प्रीतीने लिहिले होते की, " आयपीएलच्या लिलावासाठी मी चेन्नईमध्ये आलेली आहे. पण हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, तुम्हाला आमच्या संघाच्या जर्सीमध्ये कोणत्या खेळाडूंना पाहायला आवडेल? तुम्ही जे सांगाल ते मी नक्कीच ऐकेन." प्रीतीच्या या पोस्टवर सर्वात लवकर कमेंट पाहायला मिळाली ती श्रीशांतची. कारण श्रीशांतच्या आयपीएलच्या कारकिर्दीची सुरुवात ही पंजाबच्या संघापासूनच झाली होती. श्रीशांतने यावेळी प्रीतीला आपल्यालाच निवडण्यासाठी सांगितले. श्रीशांत नेमकं प्रीतीला म्हणाला की, " माझे नाव लिलावाच्या याचीत नव्हते. त्यामुळे तुम्ही जर मला संघात घेतले तर तुम्हाला कोणतीच किंमत चुकवावी लागणार नाही. त्यामुळे कदाचित तुम्ही मला संघात घेण्याचा विचार करु शकता." श्रीशांतने अजून आशा सोडेलली नाही. श्रीशांतला वाटते की, अजूनही तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळू शकतो. यापूर्वी काही वेळा स्पर्धा सुरु असताना काही खेळाडूंना संघात घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे श्रीशांत आशा आहे की, असंच मलादेखील कोणत्यातरी संघात स्थान मिळेल. गुरुवारी याबाबतचा इशारा श्रीशांतने आपल्या कमेंटच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे आता त्याच्या नावाचा विचार प्रीती झिंटा आणि पंजाबचा संघ करणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. यावर आता प्रीती झिंटा काय कमेंट करते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे आता श्रीशांतला आयपीएल खेळण्याची संधी मिळणार का, हे पाहावे लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3udMdcx
No comments:
Post a Comment