अहमदाबाद, : तिसरा कसोटी सामना हा फक्त दोन दिवसांतच संपला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही मतं व्यक्त केली होती. त्यानंतर इंग्लंडचा एक माजी कर्णधार कोहलीवर चांगलाच भडकेला पाहायला मिळाला आहे. दोन दिवसांत कसोटी सामना संपल्यानंतरही कोहलीने खेळपट्टीची पाठराखण केली होती. यावेळी कोहलीने खेळपट्टी चांगली होती, पण फलंदाजांनी मोठा चुका केल्या, असे मत सामन्यानंतर व्यक्त केले होते. त्याच्या या वक्तव्याचा समाचार आता इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसने घेतला आहे. कोहलीने यावेळी पीच तयार करणाऱ्या क्युरेटरची डिग्री तपासली होती का, असा सवालही आता कोहलीला स्ट्रॉसने विचारला आहे. स्ट्रॉस यावेळी म्हणाला की, " यावेळी खेळपट्टीची पाठराखण करत असताना कोहलीने क्युरेटरची डिग्री पाहिली होती का? मी कुकच्या बोलण्याशी सहमत आहे. कारण ज्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नसते, तिथे तुम्ही खेळपट्टीला दोष द्यायला हवा. तुम्ही त्यावेळी फलंदाजांची चुकी कशी काय काढू शकता." इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक सामन्यानंतर म्हणाला होता की, " सामना दोन दिवसांत संपूनही कोहलीने खेळपट्टीची पाठाराखण केली. ही बीसीसीआयशी निगडीत गोष्ट आहे, म्हणून कोहलीने असे केले असावे. कारण ही खेळपट्टी असूच शकत नाही. कारण या खेळपट्टीवर फलंदाजी करणे हे कठिण काम होते. खेळपट्टी खराब असताना तुम्ही फलंदाजांना कसे काय दोष देऊ शकता." तिसऱ्या कसोटीत फक्त एका फिरकीपटूसह मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघावर यांनी जोरदार हल्ला चढवला. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फक्त ८१ धावा करू शकला. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त ४९ धावांचे आव्हान मिळले. बॉयकॉट यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. तर इंग्लंडला फटकारले. अहमदाबादच्या फिरकीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय कोणाचा होता. इंग्लंडने अंतिम ११ मध्ये जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना स्थान दिले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bZlXuj
No comments:
Post a Comment