मुंबई: जागतीक क्रिकेटमधील विक्रमवीर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा () गेल्या काही दिवसांपासून चर्चे होता. याचे कारण होते आयपीएल लिलावात त्याने सहभाग घेतला होता याचे. काल चेन्नईत आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सने त्याच्या बेस प्राइसला खरेदी केले. वाचा- अर्जुन गेल्या काही हंगामापासून मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतोय. त्यामुळे लिलावात अर्जुनला मुंबई संघच बोली लावेल असे मानले जाते होते आणि अपेक्षेप्रमाणेच आठ पैकी फक्त एकट्या मुंबईने अर्जुनसाठी बोली लावली. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आलेल्या अर्जुनचे स्वागत संघाने तर सोशल मीडियावर केलेच. पण त्याच बरोबर आणखी एका व्यक्तीने अर्जुनचे अभिनंदन केले. ही व्यक्ती आणखी कोणी नाही तर अर्जुनची बहीण सारा ( ) होय. वाचा- साराने सोशल मीडियावर स्टेटसमध्ये अर्जुनचा गोलंदाजी करतानाचा फोटो ठेवला. यात तुझे हे यश कोणी हिरावून घेऊ शकत नाही, ते फक्त तुझे आहे. तर स्टेटसमधील दुसऱ्या फोटोत सारा आणि अर्जुन आहेत. त्या फोटोत ती म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो. आयपीएल लिलावाच्या चार दिवस आधी अर्जुनने एका सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली होती. त्याने ३१ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली. २१ वर्षाच्या अर्जुनने ७७ धावात ५ चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारून स्फोटक फलंदाजी केली होती. तर गोलंदाजीत ३ विकेट देखील घेतल्या. वाचा- सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने मुंबई संघाकडून दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3keOjo5
No comments:
Post a Comment