![](https://maharashtratimes.com/photo/81230394/photo-81230394.jpg)
नवी दिल्ली: 3rd test यांच्यात झालेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागला. भारताने हा सामना १० विकेटनी जिंकला. या कसोटीच्या पिचवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाचा- भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि प्रसिद्ध क्रीडा अँकर ()ने भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा कसोटी सामना दोन दिवसात संपला होता. त्यावर मयंतीने ट्विट केले. जेव्हा मला जाणीव झाली की भारत आणि इंग्लंड यांच्यातील पिंक बॉल टेस्टमध्ये तिसरा दिवस नाही... असे म्हणत तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मयंतीने विश्वास बसणार नाही अशा चेहरा केला आहे. वाचा- डे-नाइट कसोटीत इंग्लंडने भारताला विजयासाठी फक्त ४९ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने ते ७.४ षटकात एकही विकेट न गमावता पार केले. रोहित शर्माने २५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २५ तर शुभमन गिलने नाबाद २१ धावा केल्या. वाचा- सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा पहिला डाव ११२ धावात संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात १४५ धावा करत ३३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव ८१ धावांवर संपुष्ठात आणला. इंग्लंडच्या या पराभवासह ते आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. जर भारताने पुढचा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तरी ते फायनलमध्ये पोहोचतील. भारताने दुसऱ्यांदा इंग्लंडला १० विकेटनी पराभूत केले. याआधी २००१ साली मोहालीत त्यांचा १० विकेटनी पराभव केला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aXNDQN
No comments:
Post a Comment