नवी दिल्ली: भारताचा क्रिकेटपटू युसूफ पठणानने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. युसूफची ओळख स्फोटक फलंदाजी अशी होती. त्याच बरोबर तो गोलंदाजी देखील करायचा. युसूफच्या नावावर असा एक विक्रम आहे जो जगातील कोणत्याही क्रिकेटपटूने केलेला नाही. त्याने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पदार्पण केले होते आणि त्याच सामन्यात भारतीय विजेतेपद मिळवले होते. पदार्पणात वर्ल्डकप जिंकणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. तो २००७च्या टी-२० वर्ल्डकप संघाचा सदस्य होता. वाचा- आयपीएलमध्ये युसूफने दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक झळकावले आहे. त्याने २०१० मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध ३७ चेंडूत शतक झळकावले होते. भारतीय संघाकडून देखील युसूफने शानदार खेळी केल्या आहेत. २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १०५ धावा केल्या होत्या. युसूफने फक्त शतक झळकावले नव्हते तर भारताची लाज राखली होती. वाचा- या सामन्यात त्याने १५०च्या स्ट्राइक रेटने ७० चेंडूत १०५ धावा केल्या होत्या. तो भारतीय संघाला विजय मिळून देऊ शकला नाही पण देशाची लाज वाचवली. २५० धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ७ बाद ९८ अशी होती. भारताचा पराभव पक्का होता. पण युसूफच्या मनात काही वेगळेच सुरू होते. युसूफने प्रथम पियुष चावलासह आठव्या विकेटसाठी २१ धावांची भागिदारी केली. त्यानंतर जहीर खान सोबत १०० धावांची भागिदारी केली. या १०० धावात जहीरच्या फक्त २४ धावा होत्या. दोघांनी १३ षटकात १०० धावा केल्या. युसूफ बाद झाला आणि भारताच्या विजयाची आशा संपुष्ठात आली. त्याने ८ चौकार आणि ८ षटकार मारले. तो बाद झाल्यावर आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मोकळा श्वास घेतला. युसूफ बाद झाला तेव्हा भारताच्या २१९ धावा झाल्या होत्या. त्यानंतर जहीर आणि मुनाफ यांनी १५ धावा केल्या. जहीर बाद झाल्याने भारताचा पराभव झाला. पण या सामन्यातील युसूफची खेळी सर्व भारतीयांच्या मनात आजही कायम आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sBf6hj
No comments:
Post a Comment