अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना जिंकत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. आता चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. वाचा- अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फिरटीपटूंच्या जोरावर विजय मिळवला असला तरी आता चौथ्या कसोटीच्या आधी टीम इंडियाच्या मुख्य जलद गोलंदाजाने वैयक्तीक कारणामुळे माघार घेतली आहे. जसप्रीत बुमराह()ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला चौथ्या कसोटीच्या भारतीय संघातून वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. बुमराहने वैयक्तीक कारणामुळे चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही असे म्हटले आहे. वाचा- बुमराहची विनंती मान्य करण्यात आली आहे. त्याच्या जागी अन्य कोणत्याही खेळाडूचा भारतीय संघात समावेश केला गेला नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे. या खेळाडूंमधून चौथ्या कसोटीसाठी अंतिम संघ निवडला जाणार आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, वृद्धिमान सहा, आर अश्विन, कुलदीप यादव , अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव वाचा- चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली मॅच इंग्लंडने जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्या लढतीत भारताने ३१७ धावांनी शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि एकमेव डे-नाइट कसोटीत भारताने दुसऱ्या दिवशी इंग्लंडवर १० विकेटनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता चौथ्या कसोटीत भारताने विजय मिळवला किंवा ती ड्रॉ जरी केली तरी टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uBRcUz
No comments:
Post a Comment