मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी गुरुवारी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव झाला. लिलावात सर्वात शेवटचे नाव होते सचिन तेंडुलकरचा मुलगा ( )चे होय. अर्जुनने प्रथमच आयपीएलच्या लिलावात भाग घेतला होता. गेल्या महिन्यातच त्याने सैय्यद मुश्तक अली टी-२० स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यामुळे तो आयपीएलच्या लिलावासाठी पत्र ठरला. अर्जुनने त्याची बेस प्राइस २० लाख इतकी निश्चित केली होती. (mumbai indians)ने त्याच किमतीला त्याला खरेदी केले. आता अर्जुन प्रथमच वडील सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. वाचा- लिलावाच्या आधी देखील चर्चा होती की, अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जाईल. तो गेल्या काही काळापासून मुंबईच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतोय. लिलावानंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर अर्जुनचे स्वागत केले. प्रथम वानखेडेवर बॉल बॉय, गेल्या हंगामात सपोर्ट गोलंदाज आणि आता संघातील गोलंदाज. हीच वेळ आहे कामगिरी करण्याची अर्जुन असे मुंबईने सोशल मीडियावर म्हटले आहे. वाचा- मुंबई संघाने स्वागत केल्यानंतर अर्जुनने देखील आभार व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्जुन म्हणतो, लहानपणापासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, कोच, संघ मालक आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानतो. मुंबई पल्टन संघाचा भाग झाल्याबद्दल मी उत्साही आहे आणि लवकरच ब्ल्यू गोल्ड जर्सी घालण्याची वाट पाहतोय. वाचा- मुंबई इंडियन्स संघात समावेश झाल्यानंतर अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने त्याचे अभिनंदन केले. साराने सोशल मीडियावर स्टेटसमध्ये अर्जुनचा गोलंदाजी करतानाचा फोटो ठेवला. यात तुझे हे यश कोणी हिरावून घेऊ शकत नाही, ते फक्त तुझे आहे. तर स्टेटसमधील दुसऱ्या फोटोत सारा आणि अर्जुन आहेत. त्या फोटोत ती म्हणते, मला तुझा अभिमान वाटतो. आयपीएल लिलावाच्या चार दिवस आधी अर्जुनने एका सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली होती. त्याने ३१ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली. २१ वर्षाच्या अर्जुनने ७७ धावात ५ चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारून स्फोटक फलंदाजी केली होती. तर गोलंदाजीत ३ विकेट देखील घेतल्या. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने मुंबई संघाकडून दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37omCnt
No comments:
Post a Comment