चेन्नई, : यावर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी आज चेन्नईमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात काही अनुभवी खेळाडूंना स्थान मिळाले नाही, तर काही खेळाडूंना चांगलाच जॅकपॉट लागल्याचे पाहायला मिळाले. या लिलावात सर्वात जास्त महागडा ठरला तो ख्रिस मॉरिस. कारण मॉरिसची बेस प्राइज ही ७५ लाख एवढी होती. यावेळी मॉरिसला संघात घेण्यासाठी जवळपास सर्वच खेळाडूंनी बोली लावायला सुरुवात केली होती. पण मॉरिस या आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कारण मॉरिसला राजस्थान रॉयल्सच्या संघाने तब्बल १६ कोटी आणि २५ लाख रुपये मोजत संघात स्थान दिले आहे. मॉरिसनंतर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तो कायले जेमिन्सन. कारण जेमिन्सनची बेस प्राइज यावेळी ७५ लाख एवढी होती. पण जेमिन्सनला संघात स्थान देण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दांडगा अनुभव नसला तरी जेमिन्सनला यावेळी लिलावात १५ कोटी रुपये मिळाल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलपेक्षा जास्त पैसे मोजत जेमिन्सनला आपल्या संघात स्थान दिले आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे तो ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल. गेल्या हंगामात मॅक्सवेलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये मॅक्सवेलने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचा भाव या लिलावात चांगलाच वधारलेला पाहायला मिळाला. मॅक्सवेलची बेस प्राइज ही २ कोटी रुपये होती. पण यावेळी आरसीबीच्या संघाने मॅक्सवेलसाठी तब्बल १४ कोटी २५ लाख रुपये मोजले आणि त्याला आपल्या संघात स्थान दिले. पंजाब किंग्स या संघाने यावेळी सर्वाधिक पैसे मोजत जेय रिचर्डसनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. रिचर्डसनची बेस प्राइज ही यावेळी एक कोटी रुपये ठेवण्यात आली होती. पण पंजाबच्या संघाने यावेळी तब्बल १४ कोटी रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. भारताकडून यावेळी सर्वाधिक पैसे मिळाले ते के. गौतमला. आपल्या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गौतम हा या लिलावातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. गौतमची बेस प्राइज यावेळी २० लाख एवढी ठेवण्यात आली होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गौतमला यावेळी ९.२५ कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. त्यामुळे आता या खेळाडूंची कामगिरी नेमकी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jZGzWA
No comments:
Post a Comment