मुंबई : सध्याचे करोनाचे वातावरण पाहता बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना नवीन आदेश दिला आहे. यावेळी भारताच्या खेळाडूंना १ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या सध्या कसोटी मालिका सुरु आहे. त्यानंतर पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका पुण्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी ज्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्या सर्व खेळाडूंना बीसीसीआयने संघात दाखल होण्यासाठी १ मार्चपर्यंतचा कालावधी दिला आहे. जे भारतीय खेळाडू कसोटी संघाबरोबर नाहीत त्यांना १ मार्चपर्यंत अहमदाबाद येथे पोहोचायचे आहे. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. या क्वारंटाइनच्या कालावधीत त्यांची करोना चाचणीही होऊ शकते. या चाचणीचा निकाल निगेटीव्ह आल्यावर त्यांना खेळाडूंबरोबर सराव करता येऊ शकतो. डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, " शिखर धवनसहीत अन्य भारतीय खेळाडूंना बीसीसीआयने १ मार्चपर्यंत अहमदाबाद येथे पोहोचण्यास सांगितले आहे. सध्याच्या घडीला काही खेळाडू स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत आहे. त्यामुळे त्यांना लयीत येता येईल. त्यानंतर करोनाच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना संघाबरोबर रहावे लागणार आहे. कारण या सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये जावे लागणार आहे." भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका १२ ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी भारताच्या ट्वेन्टी-२० संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. या संघात १९ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. या संघात सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल तेवातिया या तीन नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला या संघातील काही खेळाडू हे बीसीसीआयच्या स्थानिक विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्यांना ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अहमदाबादला कधी पोहोचायचे, याबाबत बीसीसीआयने त्यांना कळवले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qHiZ3G
No comments:
Post a Comment