अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना बुधवारी २४ फेब्रुवारीपासून मोटेरा मैदानावर सुरू होईल. पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत ३१७ धावांनी विजय मिळवला आणि मालिका बरोबरीत केली. तिसरा सामना डे-नाइट () आहे आणि या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. वाचा- इंग्लंडच्या तुलनेत भारतीय संघाकडे डे-नाइट कसोटी सामना खेळण्याचा अनुभव कमी आहे. भारतीय संघाच्या सलामीजोडीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडीत डावाची सुरूवात करेल. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांना चांगली सुरूवात करून देता आली नाही. त्यामुळे आता या सामन्यात दोघांकडून मोठी भागिदारी करण्याची अपेक्षा असेल. वाचा- मधल्याफळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावरच संघ अवलंबून असेल. सलामीची जोडी अपयशी ठरल्यास डाव सावरणे आणि मोठी धावसंख्या उभी करण्याची जबाबदारी या तिघांवरच असेल. तिसऱ्या कसोटी मधळ्या फळीत देखील बदल होणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून शानदार फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतकडेच विकेटकिपरची जबाबदारी असेल. त्याने फलंदाजीबरोबरच विकेटच्या मागे देखील चांगली कामगिरी केली आहे. आता तिसऱ्या कसोटीत अशीच कामगिरीची आशा असेल. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान दिले जाऊ शकते. मोहम्मद सिराजच्या जागी अंतिम ११ मध्ये त्याचा समावेश निश्चित आहे. इशांत शर्मा आणि बुमराह ही जोडी तिसऱ्या कसोटीत दिसेल. तिसऱ्या कसोटीत होणारा आणखी एक बदल म्हणजे, कुलदीप यादवच्या जागी अष्टपैलू हार्दिक पंड्याला जागा मिळू शकते. अक्षर पटेलने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीत संधी दिली जाईल. फिरकीपटूंमध्ये अश्विन आणि अक्षर ही जोडी दिसेल. संभाव्य संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्ववर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, , अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा,
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MdpBYz
No comments:
Post a Comment