नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतवरील आजीवन बंदी उठल्यानंतर तो आयपीएलच्या लिलावात सामील झाला होता. पण आयपीएलच्या मुख्य लिलावाच्या यादीत श्रीशांतला स्थान देण्यात आले नव्हते. पण त्यानंतर श्रीशांतने चमकदार कामगिरी केली असून केरळच्या संघाने फक्त ५३ धावांमध्ये हा सामना जिंकला आहे. आज विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळ आणि बिहार यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात श्रीशांतने भेदक गोलंदाजी करत ९ षटकांमध्ये ३० धावा देत सर्वाधिक चार विकेट्स पटकावले. श्रीशांतच्या या अचूक गोलंदाजीमुळे बिहारच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा करता आल्या. त्यानंतर केरळच्या संघाने हे आव्हान फक्त ५३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. केरळला विजयासाठी १४९ धावा हव्या होत्या. यावेळी केरळचा सलामीवीर रॉबिन उथप्पा चांगलाच चमकला. उथप्पाने यावेळी तर एका षटकात तब्बल पाच षटकार लगावले. उथप्पाने यावेळी फक्त ३२ चेंडूंत ४ चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर नाबाद ८७ धावा फटकावल्या. उथप्पाच्या या खेळीमुळे केरळच्या संघाने हे आव्हान फक्त ८.५ षटकांमध्येच पूर्ण केले. उथप्पाला यावेळी विष्णू विनोदने चांगली साथ दिली, त्याने १२ चेंडूंत ३७ धावा केल्या. विनोद बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसननेही यावेळी धडाकेबाज फलंदाजीचा नुमना पेश केला. संजूने यावेळी फक्त ९ चेंडूंत नाबाद २४ धावांची खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kt74UO
No comments:
Post a Comment