मुंबई: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पिचवरून सुरू असलेला वाद अद्याप सुरू आहे. या वादात आता भारताचे माजी कर्णधार यांनी उडी घेतली आहे. वेंगसरकर यांनी इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पिचवर टीका केली आहे. अशा प्रकारचे पिच कसोटी क्रिकेटसाठी खराब असल्याचे ते म्हणाले. वाचा- तिसऱ्या कसोटीत अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी शानदार गोलंदाजी केली. दोन दिवसात संपलेल्या या सामन्यात भारताने १० विकेटनी विजय मिळवला. भारताने फक्त ८४२ चेंडू टाकले. वाचा- टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना वेंगसरकर म्हणाले, यात कोणतीही शंका नाही की ते पिच एक फालतू होते. कसोटी क्रिकेटसाठी अशा प्रकारची विकेट अत्यंत खराब आहे. लोक चांगले क्रिकेट पाहण्यासाठी पैसे खर्च करतात आणि मॅच पाहण्यासाठी येतात. भारताकडून ११६ कसोटी खेळणाऱ्या वेंगसरकर पुढे म्हणाले, दोन्ही संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत. जेव्हा तुम्ही जो रूट सारख्या एका महान फलंदाजाला महान गोलंदाज होताना पाहता तेव्हा साहजिक असे वाटते की विकेटमध्ये काही तरी गडबड आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट जो एक पार्ट टाइम फिरकीपटू आहे त्याने ८ धावा देत ५ विकेट घेतल्या. वाचा- वेंगसरकर हे भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख देखील राहिले होते. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांच्या बचावात्मक फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंग्लंडला पहिल्या डावात ११२ तर दुसऱ्या डावा ८१ धावा करता आल्या. चेंडू सरळ येत होता, तो वळत नव्हता. त्यांच्याकडे अशा प्रकारच्या विकेटवर खेळण्याचा कोणताही अनुभव दिसत नव्हता. वाचा- २००६ ते २०१७ या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी विकेट तयार करणारे माजी क्युरेटर सुधीर नाइक यांनी देखील या विकेटवर टीका केली. २००४ साली वानखेडेवर झालेली मॅच दोन दिवसात संपली होती. तेव्हा आयसीसीने तत्कालीन बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन डालमिया यांना पत्र लिहले होते. ज्यात एमसीएची टेस्ट होस्टिंग रद्द करण्यात येऊ यासाठीचे एक तरी कारण सांगा, अशी विचारणा केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b0HnYx
No comments:
Post a Comment