अहमदाबाद: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत मिळवलेल्या विजयानंतर अनेक दिग्गजांनी या मैदानावरील खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी आदर्श नसल्याची टीका केली आहे. यात हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसह अनेक माजी खेळाडूंचा समावेश आहे. तर सुनील गावस्कर यांचे मत या सर्वांपेक्षा वेगळे आहे. वाचा- भारताने तिसरी कसोटी १० विकेटनी जिंकली आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयानंतर अनेकांनी खेळपट्टीवर टीका केली. गावस्कर म्हणाले, फलंदाजांनी बचावात्मक पद्धतीने फलंदाजी केली आणि विकेट गमावल्या. अधिक तर फलंदाज सरळ चेंडूवर बाद झाले आहेत. कसोटी सामन्यासाठी हे पिच आदर्श नव्हते. येथे भारतीय फलंदाज देखील चालले नाहीत, असे मत लक्ष्मणने व्यक्त केले. भारताकडून ४०० विकेट घेणाऱ्या हरभजन सिंगने देखील हेच मत व्यक्त केले. कसोटी क्रिकेटसाठी ही चांगली विकेट नव्हती. इंग्लंडने पहिल्या डावात २०० धावा केल्या असत्या तर भारतीय संघ अडचणीत आला असता. पण दोन्ही संघांसाठी पिच समान होते. वाचा- जर तुम्ही अशा पद्धतीचे पिच तयार करणार असला तर एक काम करा संघांना तीन डाव खेळण्याची परवानगी द्या, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केले. युवराज सिंग म्हणाला, सामना दोन दिवसात संपला. नक्कीच कसोटी क्रिकेटसाठी हे चांगले नाही. जर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी अशा प्रकारच्या विकेटवर गोलंदाजी केली असती तर त्यांच्यानावावर १ हजार आणि ८०० विकेट असते. तरी देखील अक्षरने शानदार गोलंदाजी केली. अश्विन आणि इशांत यांचे अभिनंदन. एका सामन्यासाठी अशा प्रकारची विकेट ठिक आहे. जेथे फलंदाजाचे कौशल्य आणि तंत्र याची परीक्षा होते. पण अशा प्रकारची विकेट पुन्हा पाहण्याची इच्छा नाही. कोणत्याच खेळाडूची अशी इच्छा नसले. भारताची खुप चांगली कामगिरी झाली, असे केव्हिन पिटरसनने म्हटले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kpgu3z
No comments:
Post a Comment