अहमदाबाद, : इंग्लंला दुसऱ्या कसोटी सामन्यात दहा विकेट्सने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण या पराभवाबरोबरच इंग्लंडच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रमही जमा झाला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भारताने ५० वर्षांनंतर एक कमाल केल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने इंग्लंडचा दुसरा डाव फक्त ८१ धावांमध्येच आटोपला. यापूर्वी इंग्लंडचा संघ कधीही भारतापुढे एवढ्या कमी धावसंख्येवर ऑल आऊट झाला नव्हता. यापूर्वी इंग्लंडचा भारताविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या ही १०१ होती. हा सामना १९७१ साली इंग्लंडमधील ओव्हल या मैदानात झाला होता. त्यामुळे आता जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघावर हा लाजीरवाणा विक्रम जमा झाला आहे. भारताने १९७१ साली इंग्लंडला १०१ धावांमध्ये ऑल आऊट केले होते. त्यानंतर आता जवळपास ५० वर्षांनी भारताने आपलाच हा विक्रम मोडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या ५० वर्षांमध्ये भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध खेळताना अशी कामगिरी कधीही करता आली नव्हती. भारताविरुद्ध इंग्लंडच्या सर्वात कमी धावसंख्येची यादी- -81 Ahmedabad 2020/21 -101 The Oval 1971 -102 Mumbai WS 1979/80 -102 Leeds 1986 -112 Ahmedabad 2020/21 भारताकडून कसोटीत सर्वात वेगाने ४०० विकेट घेण्याचा विक्रम आता अश्विनच्यानावाववर जमा झाला आहे. हा विक्रम यापूर्वी अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने ८५ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. मोटेरा कसोटी अश्विनची ७७वी कसोटी आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ७२ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. भारताकडून ४०० विकेट्स मिळवणारा अश्विन हा चौथा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स या कुंबळे यांच्या नावाव़र आहेत. कारण कुंबळे यांनी ६१९ विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा क्रमांक लागतो. कपिल देव यांनी आतापर्यंत ४३४ विकेट्स मिळवल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आहे. हरभजनच्या नावावर ४१७ विकेट्स आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3r0MFZO
No comments:
Post a Comment