नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फिरकीपटू ( ) बायपास सर्जरी झाली. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार बेदी यांचे वय ७४ असून दोन- तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वाचा- वाचा- बेदी यांचे निकटवर्तीय बेदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, त्यांच्या प्रकृतीसंदर्भात मला जितकी माहिती आहे. त्यानुसार त्यांना हद्यया संदर्भात काही तक्रारी होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तीन दिवसांपूर्वी बायपास सर्जरी झाली. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. लवकरच रुग्णालयातून घरी सोडले जाणार आहे. वाचा- भारतीय संघाकडून त्यांनी ६७ कसोटी आणि १० वनडे सामने खेळले होते. कसोटीत २६६ तर वनडेत सात विकेट घेतल्या. गेल्या वर्षी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली करण्याच्या प्रस्तावाला बेदी यांनी विरोध केला होता. तेव्हा ते चर्चेत आले होते. त्याच बरोबर स्टेडियमच्या एका स्टॅडला देण्यात आलेले नाव काढून टाकण्यास सांगितले होते. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करू अशी धमकी त्यांनी डीडीसीएला दिली होती. वाचा- वाचा- टीम इंडियाकडून खेळत असताना बेदी यांनी महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. १९७६ साली जेव्हा किंगस्टन येथे वेस्ट इंडिजचे गोलंदाज घातक गोलंदाजी करत होते तेव्हा बेदी यांनी टिच्चून फलंदाजी केली होती. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भारताचे पाच फलंदाज जखमी केले होते. बेदी यांनी खालच्या क्रमांकावर येऊन कसोटी सामना वाचवला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3slIF6d
No comments:
Post a Comment