नवी दिल्ली: एखाद्या खेळाडूच्या खराब फॉर्ममुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त करणे ही गोष्ट काही नवी नाही. भारतात क्रिकेटपटूनी खराब कामगिरी केल्यास त्यांच्यावर लगेच चाहते टीका सुरू करतात. पण हा प्रकार फक्त भारतात नाही तर परदेशात देखील होतो. अशाच प्रकारची एक घटना घडली आहे ज्यात खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे चक्क त्याच्या पत्नीला दिली गेली. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकाचा कर्णधार एरॉन फिंच () सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याला धावा करता आल्या नाही. फिंचला दोन सामन्यात फक्त १३ धावा करता आल्या. त्याच्या या कामगिरीवर नाराज होत एका चाहत्याने पत्नी एमी फिंचविरुद्ध अपशब्द वापरले. संबंधित चाहत्याने फिंचच्या पत्नीला धमकी दिली. इतक नव्हे तर फिंचने टी-२० संघाचे नेतृत्व सोडून द्यावे अशी धमकी त्याने दिली. वाचा- संबंधित घटनेवर एमी फिंचने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या पती धावा करण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशा प्रकारची गोष्ट कदापी मान्य केली जाणार नाही. ही गोष्टी माझ्यासाठी एका वाइट स्वप्नासारखी आहे. याआधीही अशा प्रकारच्या गोष्टी होत होत्या. पण प्रथमच मला आणि कुटुंबाला टार्गेट केले गेले. वाचा- ... गेल्या काही काळापासून फिंचला धावा करता आल्या नाहीत. यामुळेच आयपीएलच्या २०२१च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. आयपीएलच्या २०२०च्या हंगामात देखील तो धावा करू शकला नाही. बिग बॅश लीग स्पर्धेत देखील तो अपयशी ठरला होता. वाचा- फिंचने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६८ सामन्यात २ शतक आणि १२ अर्धशतक केली आहेत. त्याच्या नावावर २ हजार १६२ धावा आहेत. तर लीग क्रिकेटच्या ३१६ सामन्यात ९ हजार ५३४ धावा केल्या आहेत. फिंच फक्त धावा करण्यात अपयशी ठरला नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला विजय देखील मिळवता आला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन टी-२० लढतीत त्यांचा पराभव झाला. त्याआधी भारताविरुद्धची टी-२० मालिका त्यांनी गमावली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bJ2q11
No comments:
Post a Comment