चेन्नई, UPDATE : काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या लिलावात तब्बल सर्व संघाचे मिळून तब्बल ६१०० कोटी रुपये खर्च झाले आहे. या लिलावात क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पण आयपीएल ही भारताच्या क्रिकेटपटूंच्या हितासाठी आहे, असे म्हटले जाते, त्यामुळे या ६१०० कोटी रुपयांपैकी भारतीय खेळाडूंना किती पैसे मिळाले, पाहा... या लिलावात फक्त ५७ खेळाडूंवर जवळपास १४५ कोटी रुपये खर्च झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचरोबर या लिलावात भारताच्या ४८५ खेळाडूंची नावं होती. या खेळाडूंवर जवळपास ३४३३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. म्हणजेच पूर्ण रक्कमेच्या जवळपास ५७ टक्के एवढे पैसे भारतीय खेळाडूंना मिळाले आहेत. त्यामुळे या लिलावात भारतीय खेळाडू पैशांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. या लिलावात सर्वाधिक पैशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना यावेळी जवळपास ९०५ कोटी रुपये मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचे ९४ खेळाडू होते. या खेळाडूंना यावेळी ९०५.९ कोटी एवढे रुपये मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये सर्वात जास्त पैसे हे ग्लेन मॅक्सवेलला मिळाले. मॅक्सवेलला या लिलावात आरसीबीच्या संघाने १४.२५ कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ५६ खेळाडू यावेळी लिलावाच्या यादीत होते. या खेळाडूंना ५३९ कोटी रुपये मिळाले आहेत. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून आयपीएलमध्ये सर्वात जास्त पैसे एबी डिव्हिलियर्सने कमावले आहेत. आतापर्यंतच्या सर्व हंगामामध्ये मिळून त्याने १०० कोटीपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे खेळाडू आहे. या लिलावात वेस्ट इंडिजचे ३३ खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंना ४५८.५४ कोटी रुपये मिळाले आहेत. इंग्लंडच्या खेळाडूंनी आतापर्यंत २८५.९६ कोटी रुपये कमावले आहेत आणि या यादीत ते पाचव्या स्थानावर आहेत. या यादीत सहाव्या स्थानावर न्यूझीलंड आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी या लिलावात २११.६६ कोटी रुपये मिळवले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZyJMmK
No comments:
Post a Comment