नवी दिल्ली: २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल टी-२० लीग स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंचे आयुष्य बदलले. प्रत्येक वर्षी होणाऱ्या लिलावात खेळाडूंना त्यांच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा जोरावर मोठी बोली लावून खरेदी केले जाते. अनेक खेळाडूंनी आंतरारष्ट्रीय क्रिकेट न खेळता देखील त्यांना काही कोटींना विकत घेतले जाते. वाचा- आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. यात हार्दिक पंड्या, केएल राहुल सारख्या खेळाडूंचा समावेश होतो. या यादीत आता आणखी एकाची भर पडली आहे. ते नाव आहे राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ( ) होय. वाचा- राहुल तेवतियाने आयपीएलच्या गेल्या हंगामात एका षटकात पाच सिक्स मारले होते. या एका ओव्हरने त्याचे क्रिकेट करिअर बदलले. स्वत:च्या हिमतीवर त्याने राजस्थानला पंजाब किंग्जविरुद्धचा सामना जिंकून दिला होता. आता राहुल टीम इंडियाची जर्सी घालण्यास सज्ज झाला आहे. वाचा- आयपीएलच्या गेल्या हंगामात ज्या गोलंदाजाला राहुलने पाच षटकार मारले होते. त्याची अवस्था मात्र उटल झाली आहे. राहुलने ( )ची धुलाई केली होती. कॉर्टेल सर्व प्रथम चर्चेत आला होता तो जेव्हा लिलावात त्याची ८.५ कोटींना खरेदी झाली होती. ज्या खेळाडूला वेस्ट इंडिज बाहेर फार ओळख नव्हती त्याला इतक्या मोठी किमत देऊन खरेदी करण्यात आले होते. वाचा- पण २०२०च्या खराब कामगिरीमुळे कॉर्टेलला रिलीझ करण्यात आले. इतक नव्हे तर २०२१च्या लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sl06Uj
No comments:
Post a Comment