Ads

Thursday, February 18, 2021

IPL लिलाव: मोहम्मद अझरूद्दीन, शाहरूख खानसह या खेळाडूंवर लागू शकते सर्वात मोठी बोली

चेन्नई: आयपीएल २०२१ साठी आज चेन्नईत लिलाव (ipl 2021 auction) होणार आहे. या लिलावात आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंसह भारतातील काही स्थानिक खेळाडूंवर सर्वांची नजर असेल. गेल्या काही दिवसात देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप उमटवलेल्या या खेळाडूंवर संघ मालक अधिक बोली लावू शकतील. वाचा- मोहम्मद अझरूद्दीन- केरळच्या या युवा खेळाडूने नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत ३७ चेंडूत शतक झळकावले होते. अझरने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत १३७ धावा केल्या होत्या. या एका सामन्यातील धमाकेदार फलंदाजीमुळे अझर स्टार झाला. आता आयपीएल लिलावात कोणता संघ त्याच्यावर बोली लावतो याची उत्सुकता लागली आहे. ज्या पद्धतीने त्याच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यानुसार अझर मालामाल होण्याची शक्यता आहे. त्याची बेस प्राइस २० लाख इतकी आहे. एलेक्स हेल्स- या खेळाडूवर देखील आयपीएलमधील संघ अधिक पैसे खर्च करू शकतील. ऑस्ट्रेलियातील बीबीएल मध्ये त्याने धमाकेदार कामगिरी केली होती. हेल्सची बेस प्राइस १.५ कोटी आहे. त्याने बीबीलमध्ये १६१.६०च्या स्ट्राइक रेटने ५४३ धावा केल्या होत्या. वाचा- केदार देवधर- देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार खेळाडू केदारवर अनेक संघांचे लक्ष आहे. जे खेळाडू मालामाल होऊ शकतात त्यामध्ये केदारचा समावेश आहे. सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने धावा केल्या आहेत. ३१ वर्षीय या खेळाडूने ६९.८०च्या सरासरीने ३४९ धावा केल्या. केदारची बेस प्राइस २० लाख आहे. डेव्हिड मलान- इंग्लंडच्या डेव्हिड मलानवर देखील सर्वांची नजर असेल. मलानवर पैशांच्या वर्षाव होऊ शकतो. त्याची बेस प्राइस १.५ कोटी आहे. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत मलान सध्या क्रमांक एकवर आहे. त्याच्या सारख्या स्फोटक फलंदाजाला संघात घेण्यासाठी प्रत्येक संघ उत्सुक असेल. एलेक्स कॅरी- ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर कॅरीची बेस प्राइस १.५ कोटी आहे. बीबीएलमध्ये ब्रिसबेन हीट विरुद्ध त्याने ६२ चेंडूत शतक झळकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे विकेटकिपर फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. वाचा- कृष्णप्पा गौतम- लिलावात भारताच्या या ऑलराउंडर क्रिकेटपटूला अधिक मागणी मिळू शकते. उत्तम फिरकीपटू सोबत गौतम वेगाने धावा करू शकतो. भारतातील धीम्या मैदानावर त्याचा उपयोग होऊ शकतो. शाहरूख खान- २०२१च्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शाहरूखने २२०च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. तामिळनाडूच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. शाहरूख संघ दबावात असताना मोठे शॉर्ट खेळू शकतो. मधळ्या फळीतील फिनिशर अशी त्याची ओळख आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3k0mQWL

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...