अहमदाबाद: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशीच लागला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेटनी विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवासह इंग्लंडचा संघ आयसीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर भारतीय संघाने चौथी कसोटी ड्रॉ जरी केली तरी ते फायनलमध्ये पोहोचू शकतील. या उटल इंग्लंडने चौथा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचेल. वाचा- नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकला होता. त्यांचा पहिला डाव फक्त ११२ धावांवर संपुष्ठात आला. त्यानंतर भारताने पहिल्या डावात १४५ धावा करत ३३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडला फक्त ८१ धावा करता आल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त ४९ धावांचे आव्हान मिळले. हे लक्ष्य भारताने सहज पार केले आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतील. दोन्ही संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना याच मैदानावर होणार आहे. वाचा- या सामन्यात भारताच्या अक्षर पटेलने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या. डे-नाइट कसोटीत ७० धावा देत ११ विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. कसोटीच्या या प्रकारातील ही कोणत्याही गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. याच बरोबर आर अश्विनने कसोटी करिअरमधील ४०० विकेटचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंग यांनी अशी कामगिरी केली आहे. वाचा- अश्विनने ७७ कसोटीत ४०० विकेट घेतल्या आणि भारताकडून वेगवान ४०० विकेट घेण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. तर जागतिक क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने ७२ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. वाचा- इंग्लंडकडून भारताच्या पहिल्या डावात कर्णधार जो रूटने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. करिअरमध्ये पाच विकेट घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. तर डे-नाइटमध्ये इंग्लंडकडून झालेली ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pUoJWy
No comments:
Post a Comment