जयपूर: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात निवड न झाल्याने चर्चेत आलेला मुंबईचा खेळाडू ()ने एक तुफानी खेळी केली आहे. विजय हजारे स्पर्धेतील पुड्डूचेरीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने ५० चेंडूत शतक झळकावले. पृथ्वी शॉच्या स्फोटक द्विशतकाच्या जोरावर मुंबईने या सामन्यात विक्रमी ४५७ धावा केल्या. वाचा- विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यात ()ची वादळी खेळीची चर्चा सुरू आहे. या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. त्याने ५८ चेंडूत २२ चौकार आणइ ४ षटकारांसह १३३ धावा केल्या. सूर्यकुमारने ५० चेंडूत शतक केले आणि त्यानंतर ७ चेंडूत ३३ धावा करून तो बाद झाला. मुंबईच्या डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली. यशस्वी १० धावांवर बाद झाल्यानंतर पृथ्वीने आदित्य तारेसोबत दुसऱ्या विकेटसाठी दीडशे धावांची भागिदारी केली. तारे ५६ धावांवर बाद झाला तेव्हा मुंबईने २ बाद २११ धावा केल्या होत्या. वाचा- ... तारेच्या जागी आलेल्या सूर्यकुमारने पृथ्वी सोबत तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी केली. या दोघांनी गोलंदाजांना कोणतीही दया दाखवली नाही. काही दिवसांपूर्वी सूर्यकुमारची इंग्लंडविरुद्धच्या टी-२० संघात निवड झाली होती. सूर्यकुमारने याआधी देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा केल्या होत्या. पण त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नव्हती. आता सूर्यकुमारने पुन्हा एकदा सिद्ध करू दाखवले की तो टीम इंडियासाठी परफेक्ट खेळाडू आहे. श्रेयस अय्यरच्या गैरहजेरीत या सामन्यात पृथ्वी मुंबईचे नेतृत्व करत आहे. त्याने १५२ चेंडूत ३१ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद २२७ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37Lg56h
No comments:
Post a Comment