अहमदाबाद: अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्या शानदार गोलंदाजीच्या जारोवर भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १० विकेटनी विजय मिळवला. नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या या डे-नाइट सामन्यात भारताने दुसऱ्याच दिवशी विजय मिळवाल. फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर इंग्लंडचा संघ ११२ आणि ८१ धावांवर बाद झाला. तर भारताने पहिल्या डावात १४५ धावा करून ३३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातील विजयासाठीचे ४९ धावांचे लक्ष्य भारताने एकही विकेट न गमवता पार केले. भारतीय संघाच्या या विजयात एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वाचा- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वेळेत सामना जिंकण्याच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे. दोन दिवसात सामना जिंकण्याची भारताची ही पहिली वेळ नाही. याआधी २०१८ साली बेंगळुरू कसोटीत भारताने अफगाणिस्तानवर दोन दिवसात २६२ धावांनी विजय मिळवला होता. कसोटी क्रिकेटमध्ये दोन दिवसात संपलेली ही २२वी कसोटी ठरली. तर २०व्या शतकात ही सहावी मॅच ठरली ज्याचा निकाल फक्त दोन दिवसात लागला. भारतीय संघाने सर्वात कमी चेंडूत हा विजय मिळवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने फक्त ८४२ चेंडूत विजय मिळवला. वाचा- २००० सालाच्या आदी १९४६ साली न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीचा निकाल दोन दिवसात लागला होता. २००० ते २००८ या काळात सहा कसोटी सामने झाले ज्याचे निकाल दोन दिवसात लागले होते १९४६ पासून आताप पर्यंत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांनी प्रत्येक दोन वेला अशी कामगिरी केली होती. आता भारतीय संघाने देखील अशी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन दिवसात सामना संपण्याची पहिली घटना १८८२ साली झाली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. १८०० मध्ये ९ कसोटी सामने असे होते ज्यांचा निकाल दोन दिवसात लागला होता. १९व्या शतकात ही संख्या ६ वर आली. तर २०व्या शतकात ही संख्या ७ वर गेली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZPHz6D
No comments:
Post a Comment