नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी आणि ७० शतक झळकावणारा भारताचा कर्णधार ()ने त्याच्या करिअरमधील एका कठीण प्रसंगाबद्दल सांगितले. विराट सध्या शानदार फलंदाज म्हणून ओळखला जात असला तरी एक काळ असा होता, जेव्हा विराटला नैराश्य आले होते. वाचा- भारतीय संघ २०१४ साली इंग्लंड दौऱ्यावर होता तेव्हा विराटची कामगिरी खराब होत होती. सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे विराटला नैराश्य आले होते आणि त्याला लोकांच्या सोबत देखील एकटे वाटत असे. इंग्लंडचे माजी खेळाडू मार्क निकोल्ससोबत बोलताना विराटने याबद्दल सांगितले. निकोल्स यांनी कधी डिप्रेशनमध्ये गेला होता का असा प्रश्न विचारला. यावर तो म्हणाला, हो माझ्या सोबत देखील असे झाले होते. याचा विचार करून देखील चांगले वाटत नाही की तुम्ही धावा करू शकत नाही. मला वाटते की सर्व फलंदाजांना असे वाटते की तुमचे कशावरच नियंत्रण नाही. वाचा- २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटीतील १० डावात विराटने १३.५०च्या सरासरीने धावा केल्या. त्याने १,८,२५,०,३९,२८,०,७,६ आणि २० धावा केल्या होत्या. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियात दौऱ्यात विराटने ६९२ धावा करत शानदार कमबॅक केले. वाचा- खराब कामगिरीमुळे मला सर्व लोकांसोबत असताना देखील एकटे वाटत होते. माझ्यासोबत बोलण्यासाठी कोणी नव्हेत असे नाही. पण मी ज्या अवस्थेतून जात होतो. ते समजून घेणारे कोणी नव्हते, असे विराट म्हणाला. विराटच्या मते मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. कारण यामुळे कोणत्याही खेळाडूचे करिअर खराब होऊ शकते. त्या काळात अशी एक व्यक्ती हवी ज्याला तुम्ही जाऊन सांगू शकाल की, मला झोप येत नाही. मला सकाळी उठायचे नाही. मला स्वत:वर विश्वस नाही. मी काय करू. वाचा- अनेकांना मोठ्या कालावधीसाठी असे वाटत राहते. यात अनेक महिने जातात. संपूर्ण एका सत्रात असे वाटू शकते. काही जण त्यातून बाहेर येत नाहीत. माझ्या मते अशावेळी मदतीची गरज असते, असे विराट म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NiTdUI
No comments:
Post a Comment