मुंबई : आयपीएलच्या लिलावात आरसीबीच्या संघाने ज्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली, त्या खेळाडूला सध्या सुरु असलेल्या सामन्यात फक्त एकच धाव काढता आली आहे. त्यामुळे आता आरसीबीच्या चिंतेत भर पडली आहे, असे चाहते म्हणत आहेत. आयपीएलच्या लिलावात आरसीबीच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलवर सर्वाधिक बोली लावली होती. आरसीबीने मॅक्सवेलला तब्बल १४.२५ कोटी रुपये मोजत आपल्या संघात दाखल केले होते. पण आज झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यात मॅक्सवेलला फक्त एकच धाव काढता आल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात मॅक्सवेल पाच चेंडू खेळला आणि त्याला फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले. गेल्यावर्षीच्या आयपीएल मध्ये मॅक्सवेल फॉर्मात नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी त्याला १०.७५ कोटी रुपये मोजत किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले होते. पण गेल्या आयपीएलमध्ये मॅक्सवेलला एकही षटकार मारता आला नव्हता. त्याच़बरोबर सातत्याने तो अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले होते. यावर्षी मॅक्सवेलला पंजाबपेक्षा जास्त पैसे आरसीबीच्या संघाने दिले आहेत. जेव्हा आरसीबीने मॅक्सवेलसाठी १४.२५ कोटी रुपये मोजले तेव्हा काही जणांना धक्का बसला होता. कारण गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये मॅक्सवेलने सर्वांनाच निराश केले होते. त्याच्या बॅटमधून धावाच निघत नव्हत्या. पण हे कारण असतानाही आरसीबीच्या संघाने त्याला मोठी किंमत देत आपल्या संघात दाखल करुन घेतल्याचे पाहायला मिळाले. आज झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेवोनच्या धमाकेदार फलंदाजीमुळे यजमान संघाने ५ बाद १८४ धावा केल्या. फक्त ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या न्यूझीलंडकच्या डेवोन कोनवे याने पहिल्या टी-२० लढतीत ५९ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांसह नाबाद ९९ धावा केल्या. सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १९ असी होती. तेव्हा डेवोनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १७.३ षटकात १३१ धावांवर बाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NUQyjW
No comments:
Post a Comment