नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह()चा मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ()ने बुमराहचा विक्रम मागे टाकला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी १५ कसोटी, २२ वनडे आणि २१ टी-२० सामने खेळणाऱ्या शाहीनने एकूण ११७ विकेट घेतल्या आहेत. त्याने वयाच्या २०व्या वर्षी टी-२० मध्ये आजवर कोणाला जमले नाही अशी कामगिरी करून दाखवली. शाहीनने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १०० विकेट घेतल्या आहेत. त्याने २० वर्ष आणि ३२६व्या दिवशी ही कामगिरी करून दाखवली. सर्वात कमी वयात अशी कामगिरी करण्याचा विक्रम याआधी भारताच्या जसप्रीत बुमराहच्या नावावर होता. बुमराहने १९व्या वर्षी पदार्पण केले होते आणि २३ वर्ष ५७व्या दिवशी टी-२० मध्ये १०० विकेट घेण्याची कामगिरी केली होती. आता शाहीनने हा विक्रम मोडला. शाहीनने ७४ टी-२० सामन्यात १०० विकेट घेतल्या आहेत. १९ धावात ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. शाहीन सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळत आहे. तो लाहोर कलंदर्स संघाकडून खेळतो. लाहोरकडून खेळताना त्याने मुल्तान सुल्तानविरुद्ध सर्वात कमी वयात १०० विकेट घेण्याची कामगिरी केली. टी-२० मध्ये काही दिवसांपूर्वी भारताच्या रोहित शर्माचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या खेळाडूने मागे टाकला होता. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील विक्रम मागे टाकला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pZLubB
No comments:
Post a Comment