अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यात उद्यापासून होणारा तिसरा कसोटी सामना टीम इंडियाचा जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास असा ठरणार आहे. इशांतचा हा १००वा कसोटी सामना आहे. त्याने २५ मे २००७ रोजी ढाका येथे बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. त्यानंतर १३ वर्षांनी तो १००वी कसोटी खेळणार आहे. वाचा- गेल्या ३-४ वर्षापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. इशांतच्या या यशाबद्दल त्याची पत्नी आणि भारतीय बास्केटबॉल संघाची माजी सदस्य प्रतिमा सिंह सांगितले. इशांत कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्त यामुळे इतके यश मिळवू शकला. गेल्या १० वर्षात इशांतने कधीच ट्रेनिंग चुकवली नाही. वाचा- इशांतच्या १००व्या कसोटीसाठी आई-वडील यांच्यासह कुटुंबातील १५-१६ जण येणार आहेत. १०० कसोटी सामने ही गोष्टी इशांतसाठी फार मोठी नाही. १०० कसोटी असो वा ३०० विकेट हे रेकॉर्ड त्यासाठी महत्त्वाचे नाहीत, असे प्रतिमा म्हणाली. वाचा- फोनवर रडला होता इशांत इशांत फार गप्पा मारत नाही आणि त्याच्या मनातील गोष्टी पटकन सांगत नाही. २०१३ सालच्या एका घटनेबद्दल प्रतिमाने सांगितले. तेव्हा आमचे लग्न झाले नव्हते. मोहालीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात जेम्स फॉकनरने त्याच्या एका ओव्हरमध्ये ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर फोनवर तो ढसाढसा रडला होता. क्रिकेटला इतक ही डोक्यावर घेऊ नको. ही एक मोठी गोष्ट आहे पण तो खेळ आहे. जेव्हा तुम्ही असा विचार करता की हा एक खेळ आहे तेव्हा अशा गोष्टीतून बाहेर पडता, असे प्रतिमाने त्याला समजावले होते. वाचा- ...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dFr0SL
No comments:
Post a Comment