Ads

Thursday, February 18, 2021

IPL AUCTION 2021 : हरभजन सिंगचे लिलावात नेमके झाले तरी काय, पाहा मिळाला का कोणी वाली...

चेन्नई, : भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचे या लिलावात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण चेन्नईच्या संघाने हरभजनला सोठचिठ्ठी दिली होती. त्यामुळे हरभजनचे या लिलावात काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. हरभजनसाठी यावेळी दोन कोटी रुपये एवढी बेस प्राइज ठेवण्यात आली होती. लिलावात हरभजनचे नाव उच्चारले गेले आणि त्याची बेस प्राइज यावेळी सांगण्यात आली. त्यानंतर काही संघांमध्ये यावेळी कुचबुज झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हरभजनचे नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हरभजनचे नाव घेतल्यावर काही संघ त्याच्याबाबत चर्चा करत होता. त्यावेळी हरभजनवर पहिली बोली कोण लावणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण .यावेळी हरभजनवर कोणीही बोली लावायला उत्सुक असल्याचे दिसले नाही. त्यामुळे या लिलावात हरभजन अनसोल्ड असल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्ज संघाने या वर्षी हरभजन सिंगला रिलीझ केले आहे. गेल्या वर्षी युएईत झालेल्या स्पर्धेत हरभजनने वैयक्तीक कारणामुळे खेळण्यास नकार दिला होता. चेन्नई संघ प्रथमच क्वालीफायलमध्ये पोहोचला नाही आणि गुणतक्त्यात सातव्या स्थानावर राहिला. दोन कोटी बेस प्राइस असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये हरभजनचा देखील समावेश आहे. मोठ्या कालावधीपासून हरभजन क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता कमी दिसते. चेन्नईच्या संघातील मराठमोळ्या केदार जाधवलाही यावेळी कोणी वाली मिळाला नाही. या लिलावात ख्रिस मॉरिसला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉ़यल्स यांच्यामध्ये चांगलीच चढाओढ लागली होती. पण अखेर आतापर्यंतच्या लिलावात १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सच्या संघाने मॉरिसला आपल्या संघात दाखल करुन घेतले. आतापर्यंतची सर्वाधिक बोली ही त्याच्यावरच लागली गेल्याचे पाहायला मिळाले. स्मिथची बेस प्राइज होती ती २ कोटी. स्मिथला या किंमतीमध्येच संघात घेण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक होता. पण त्यानंतर दिल्लीच्या संघाने २ कोटी २० लाख रुपयांची बोली स्मिथवर लावली आणि त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले. आयपीएलचा लिलाव सुरु झाला तो करुण नायरपासून.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZqNxe3

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...