मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज () आता युवा खेळाडूंना मोफत मार्गदर्शन करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतक करणाऱ्या सचिन तेंडुलकर त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन सर्वांना देणार आहे. वाचा- ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या अनएकेडमीने ही घोषणा केली आहे. सचिनची ऑनलाइन लाइव्ह इंटरेक्टिव्ह पद्धतीने एक सिरीज आयोजित केली जाणार आहे. या माध्यमातून सचिन युवा खेळाडूंना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देईल. विशेष म्हणजे सचिनचा हा क्लास प्लॅटफॉर्मवर मोफत असेल. अनएकेडमीने सचिन तेंडुलकरला ब्रॅडअॅबेसिडर म्हणून निवडले आहे. वाचा- मी ऑनलाइन माध्यमातून एक मोफत सत्र करणार आहे. यात सर्वजण सहभागी होऊ शकतात. या सत्रातून माझे विचार शेअर करणार आहे. मी याआधी अनेक मुलांसोबत प्रत्यक्षात चर्चा केली आहे आणि त्यांना मार्गदर्शन केले आहे. पण ऑनलाइन माध्यमातून प्रथमच चर्चा करणार आहे. त्यामुळे ही चर्चा फक्त काही युवा क्रिकेटपटूंपर्यंत नाही तर लाखोंच्या पर्यंत पोहोचेल, असे सचिन म्हणाला. वाचा- प्रत्येकापर्यंत हे मार्गदर्शन पोहोचले पाहिजे आणि त्यांचा प्रश्न माझ्यापर्यंत आला पाहिजे, हा आमचा हेतू असल्याचे सचिनने सांगितले. वाचा- नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला २० लाख रुपयात खरेदी केले होते. सचिन मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे प्रथचम अर्जुन वडील सचिनच्या मार्गदर्शनाखाली या वर्षाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kgABAX
No comments:
Post a Comment