चेन्नई: २०२१साठी लिलावाला चेन्नईत सुरूवात झाली आहे. लिलावाच्या पहिल्या सत्रात ख्रिस मॉरिसला १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेऊन राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलयाच्या ग्लेन मॅक्सवेलला १४ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले. गेल्या वर्षी मॅक्सवेलची कामगिरी खराब झाल्याने त्याला पंजाब किंग्ज संघाने रिलीझ केले होते. मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि बेंगळुरू संघात मोठी सुरूच दिसली. अखेर बेंगळुरूने बाजी मारली. चेन्नई संघाला मॅक्सवेलला खरेदी करता न आल्याने त्यांना इंग्लंडचा अष्टपैलू मोइन अलीवर बोली लावली त्यांनी दोन कोटी बेस प्राइस असलेल्या अलीला ७ कोटींनी विकत घेतले. चेन्नई संघात विकत घेतल्यानंतर सीएसकेने त्याचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत केले. इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दुसऱ्या कसोटीत मोइन अलीने ८ विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात ४३ धावा केल्या होत्या. तरी देखील इंग्लंडने त्याला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी वगळण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने जरी अलीला संघातून वगळले तर आयपीएलच्या लिलावात त्याला चांगली बोली मिळाली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37qrdWl
No comments:
Post a Comment