नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात एकाच पद्धतीने शून्यावर बाद झालेल्या मुंबईचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने Form is temporary असतो आणि class is permanent सिद्ध करून दाखवले. गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वीच्या फलंदाजीवर टीका होत होती. पण मुंबईच्या या स्फोटक फलंदाजाने फक्त ३ सामन्यात सर्वांना उत्तर दिले. विजय हजार ट्रॉफीत पृथ्वीने पुड्डूचेरीविरुद्धच्या सामन्यात प्रथम ६५ चेंडूत शतक त्यानंतर १४२ चेंडूत द्विशतक झळकावले. या स्पर्धेतील पृथ्वीची ही दुसरी धडाकेबाज खेळी आहे. याआधी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने ८९ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या महाराष्ट्र विरुद्धच्या लढतीत त्याने ३४ धावा केल्या. वाचा- यशस्वी जयस्वाल आणि पृथ्वी यांनी मुंबईच्या डावाला सुरूवात केली. यशस्वी पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो १० धावांवर बाद झाला. त्यानंतर आदित्य तारेने पृथ्वी सोबत दीडशतकी भागिदारी केली. आदित्य ५६ धावांवर बाद झाला. आदित्यच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवसोबत पृथ्वीची बॅट आणखी तळपली. या दोघांनी पुड्डूचेरीच्या गोलंदाजांना पळवून पळवून मारले. वाचा- जयपूरमध्ये सुरू असलेल्या सामन्यात पुड्डूचेरीने टॉस जिंकून मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पृथ्वी पहिल्या ओव्हरपासून गोलंदाजांवर तुटून पडला. पृथ्वीच्या स्फोटक खेळीत सहभागी झाला तो मुंबईचा आणखी एक धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव, त्याने फक्त ५८ चेंडूत १३३ धावा केल्या. या दोघांच्या वादळी खेळीने मुंबईने ५० षटकात ४ बाद ४५७ धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या गैरहजेरीत या सामन्यात पृथ्वी मुंबईचे नेतृत्व करत आहे. त्याने १५२ चेंडूत ३१ चौकार आणि ५ षटकारांसह २२७ धावा केल्या. वाचा- पृथ्वी केल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये होता. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याला धावा करता आल्या नव्हत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत तो एकाच पद्धतीने दोन्ही डावात शून्यावर बाद झाला होता. तेव्हा पृथ्वीवर प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे संघातून डच्चू दिला गेला आणि शुभमन गिलला संधी दिली गेली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पृथ्वीने दमदार सुरूवात केली होती. त्याने पहिल्याच कसोटीत शतक झळकावले होते. पण त्यानंतर त्याला एकही शतक करता आले नाही. डोपिंग चाचणीत फेल झाल्याने त्याच्यावर काही महिन्यांची बंदी घातली गेली होती. पण त्यानंतर पृथ्वीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3klWK0I
No comments:
Post a Comment