अहमदाबाद, : आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकही संधी न मिळालेल्या हार्दिक पंड्याने सरावामध्ये सुपरमॅनसारखी उडी मारत एक भन्नाट झेल सीमारेषेजवळ पकडल्याचे पाहायला मिळाले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघ आज चौथ्या कसोटी सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये सराव करत होता. यावेळी क्षेत्ररक्षणाचा सराव करत असताना हार्दिकला सीमारेषेजवळ उभे करण्यात आले होते. यावेळी हवेतून एक चेंडू हार्दिकच्या दिशेने आला. हा चेंडू आता सीमारेषेपार जाणार, असे काही जणांना वाटत होते. पण त्यावेळीच हार्दिकने सुपरमॅनसारखी उडी मारत एक अफलातून झेल पकडल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीता व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. आतपर्यंत इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. पण या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये हार्दिकला संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण आता चौथ्या कसोटी सामन्यासाठी सराव करत असताना हार्दिकने हा जबरदस्त झेल पकडत आपला दावा सांगितला आहे. कारण आतापर्यंत भारतीय संघाने काही झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जर हार्दिकला संघात स्थान दिले एक अव्वल अष्टपैलू खेळाडू भारताला मिळू शकतो. हार्दिक फलंदाजीबरोबरच वेगवान गोलंदाजीही करू शकतो. त्याचबरोबर आता क्षेत्ररक्षणातही त्याने आपली चमक दाखवून दिली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला तिसरा कसोटी सामना हा फक्त दोन दिवसांतच संपला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही मतं व्यक्त केली होती. त्यानंतर इंग्लंडचा एक माजी कर्णधार कोहलीवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला आहे. दोन दिवसांत कसोटी सामना संपल्यानंतरही कोहलीने खेळपट्टीची पाठराखण केली होती. यावेळी कोहलीने खेळपट्टी चांगली होती, पण फलंदाजांनी मोठा चुका केल्या, असे मत सामन्यानंतर व्यक्त केले होते. त्याच्या या वक्तव्याचा समाचार आता इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसने घेतला आहे. कोहलीने यावेळी पीच तयार करणाऱ्या क्युरेटरची डिग्री तपासली होती का, असा सवालही आता कोहलीला स्ट्रॉसने विचारला आहे. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर बऱ्याच जणांनी टीका केल्याचे आता समोर आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kugJdA
No comments:
Post a Comment