चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी आज चेन्नईत मिनी लिलाव () होणार आहे. आयपीएलचा गेला हंगाम करोना व्हायरसमुळे युएईमध्ये खेळवण्यात आला होता. पण यावेळी ही स्पर्धा भारतात होणार असल्याने सर्वाची उत्सुकता वाढली आहे. आयपीएलचा १३वा हंगाम आणि आता होणारा १४वा हंगाम यात काही महिन्यांचे अंतर असल्याने यावर्षी मिनी लिलाव करण्याचे बीसीसीआयने ठरवले. बीसीसीआयने या लिलावासाठी काही नियम तयार केले आहेत. ज्याचे पालन स्पर्धेतील आठही संघाना करावे लागणार आहे. वाचा- लिलावात सहभागी होणाऱ्या आठही संघांपैकी काहींना अधिक खेळाडूंची गरज आहे तर काहींना कमी खेळाडूंची आवश्यकता आहे. लिलावासाठी एकूण २९२ खेळाडू उपलब्ध आहेत. त्यापैकी १६४ भारतीय असून अन्य परदेशी खेळाडू आहेत. लिलावात सर्वाधिक पैसे असलेला संघ म्हणजे पंजाब किंग्ज होय. त्यांच्याकडे ५३.२० कोटी इतकी रक्कम आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे १०.७५ कोटी इतकी रक्कम आहे. वाचा- आयपीएलच्या या लिलावात बीसीसीआयने पाच महत्त्वाचे नियम केले आहेत. जाणून घेऊयात त्याच्याबद्दल... १) कोणत्याही संघाला निश्चित केलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम खर्च करू खेळाडू विकत घेत येणार नाही. लिलावासाठी प्रत्येक संघाला ८५ कोटी इतकी रक्कम देण्यात आली होती. त्यापैकी सध्या पंजाब किंग्ज कडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. २) खर्च करण्यात येणाऱ्या एकूण रक्कमेपैकी (८५ कोटी) प्रत्येक संघाला कमीत कमी ७५ टक्के रक्कम खर्च करावी लागेल. अशा स्थितीत जर एखाद्या संघाने ७० टक्के रक्कम खर्च केली तर शिल्लक पाच टक्के रक्कम बीसीसीआयकडे जाईल. यामुळेच पंजाब, राजस्थान आणि बेंगळुरू हे संघ मोठे खेळाडू खरेदी करू शकतील. वाचा- ३) या वेळी लिलावात राइट टू मॅच कार्ड हा पर्याय उपलब्ध नसले. ज्यामुळे लिलावाच्या आधी रिलीझ करण्यात आलेल्या खेळाडूला पुन्हा साइन करता येणार नाही. रिलीज खेळाडूला पुन्हा संघात घ्यायचे असेल तर संबंधित संघाला त्यावर पुन्हा बोली लावावी लागेल. ४) बीसीसीआयकडून प्रत्येक संघात कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती खेळाडू असतील याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एका संघात जास्ती जास्त २५ तर कमीत कमी १८ खेळाडू असतील. सध्याच्या स्थितीनुसार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीत खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात सर्वाधिक जागा शिल्लक आहेत. तर सनरायजर्स हैदराबादकडे फक्त ३ जागा शिल्लक आहेत. ५) लिलावातील आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे प्रत्येक संघात किती परदेशी आणि भारतीय खेळाडू असावेत याचा होय. प्रत्येक संघात जास्ती जास्त २५ तर कमीत कमी १७ भारतीय खेळाडू असेल पाहिजेत. प्रत्येक संघ जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंना निवडू शकतो. भारतीय खेळाडूंबाबत अशी कोणतीही मर्यादा नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qAlB3k
No comments:
Post a Comment