नवी दिल्ली : यावर्षीच्या आयपीएलचा मोसम आता काही महिन्यांवर येऊटन ठेपला आहे. आता एप्रिलपासून आयपीएल सुरु होणार आहे. पण आयपीएलचा सराव सुरु करण्यापूर्वी मात्र चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका खास मंदीराला भेट दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी धोनीचे फोटो चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. धोनी सध्याच्या घडीला झारखंडमध्ये आहे. धोनी जेव्हा झारखंडमध्ये असतो आणि त्याला कधीही एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात करायची असते तेव्हा तो येथील देवडी माता मंदीरामध्ये नक्कीच जात असतो. धोनीने या मंदीरात जाऊन देवडी मातेचे दर्शन घेतले. धोनीने या मंदीरात जाऊन देवीची पुजा-अर्चनाही केली. पण त्याचवेळी धोनी या मंदीरात पोहोचल्याचा सुगावा त्याच्या चाहत्यांना लागला आणि त्यांनी धोनीला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळेच धोनीचा यावेळी घेण्यात आलेला फोटो हा चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. धोनी या मंदीरात येणार असल्याचे जेव्हा चाहत्यांना समजले तेव्हा त्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती. धोनीची एक झलक पाहण्यासाठी हे चाहते आतुर झाले होते. यावेळी चाहत्यांना धोनीबरोबर फोटो आणि सेल्फीही काढायचे होते. पण धोनीने यावेळी आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. धोनीने यावेळी आपल्या चाहत्यांबरोबर फोटो आणि सेल्फीही काढले. झारखंडमध्ये देवडी मातेचे मंदीर हे प्रसिद्ध आहे, हे मंदीर टाटा मार्गावर आहे. धोनी या मंदीराच्या परिसरात जवळपास २५ मिनिटे होता. यावेळी मंदीरातील मुख्य पुजारी मनोज पांडा आणि नरसिंह पांडा यांनी धोनीकडून यावेळी पुजा करुन घेतली. धोनी जेव्हा या मंदीरात पोहोचला तेव्हा सुरक्षारक्षकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. चेन्नईचा संघ यावेळी पहिल्यांदाच तळाला गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर धोनीच्या संघाला यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या स्पर्धेनंतर लिलावापूर्वी चेन्नईच्या संघाने बऱ्याच खेळाडूंनी सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने चेतेश्वर पुजारासारख्या फलंदाजालाही आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याच़बरोबर चेन्नईने य लिलावात काही खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे आता धोनी या नव्या खेळाडूंसह कशी रणनिती आखतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZXV6ZQ
No comments:
Post a Comment