अहमदाबाद, : भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक वेगळाच अवतार या सामन्यात सर्वांना पाहायला मिळाला. कारण इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद केल्यावर कोहलीने अनोखे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. कोहलीच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. जो रुट हा इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा समजला जातो. इंग्लंडने जो पहिला कसोटी सामना जिंकला होता, तेव्हा रुटने द्विशतक झळकावले होते. त्याचबरोबर या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वात जास्त धावा होतील, असे म्हटले जात होते. त्यामुळे रुट यावेळी किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. रुटने यावेळी चांगली सुरुवातही केली होती. पण भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने यावेळी रुटचा काटा काढला. अश्विनने यावेळी रुटला पायचीत पकडले आणि भारतीय संघाने आनंद साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी कोहलीने भन्नाट सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. रुटला यावेळी १७ धावांवर समाधान मानावे लागले. रुट लवकर बाद झाल्याचा आनंद यावेळी कोहलीच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या सेलिब्रेशनमधून दिसत होता. त्यामुळए चाहत्यांना विराटचा व्हिडीओ चांगलाच आवडलेला पाहायला मिळत आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. याआधी प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदान सर्वात मोठे होते. त्याची क्षमता १ लाख इतकी आहे. ६३ एकर परिसरात असलेल्या या मैदानावर ऑलिपिंक साइझचे स्विमिंग पूल आहे. तर चार ड्रेसिंग रूम आहेत. स्टेडियमच्या परिसरात बॉक्सिंग , बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य कोर्ट आहेत. या परिसरात हॉकी आणि फुटबॉल मैदान देखील आहेत. या मैदानाचे खास वैशिष्ट म्हणजे प्रत्येक ड्रेसिंग रुमला जिम आहे. जे क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळत नाही. मोटेरा येथील जुने मैदान १९८२ साली बांधण्यात आले होते. आता या नव्या मैदानासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला. हे मैदान दोन वर्षात बांधून पूर्ण झाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qRXsFk
No comments:
Post a Comment