Ads

Thursday, February 25, 2021

IND vs ENG : अश्विनने केली कमाल, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय क्रिकेटपटू...

अहमदाबाद, : भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने या सामन्यात ४०० कसोटी विकेट्स कमाल केली. त्याचबरोबर अश्विनने यावेळी एक असा पराक्रम केला आहे, जो आतापर्यंत एकाही भारतीय क्रिकेटपटूला करता आलेला नाही. अश्विनने यावेळी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला बाद करत कसोटी क्रिकेटमधील ४०० विकेट्स पूर्ण केल्या. त्याने या सामन्यापूर्वी ३९४ विकेट घेतल्या होता. भारताकडून कसोटीत सर्वात वेगाने ४०० विकेट घेण्याचा विक्रम आता अश्विनच्यानावाववर जमा झाला आहे. हा विक्रम यापूर्वी अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने ८५ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. मोटेरा कसोटी अश्विनची ७७वी कसोटी आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ७२ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. भारताकडून ४०० विकेट्स मिळवणारा अश्विन हा चौथा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स या कुंबळे यांच्या नावाव़र आहेत. कारण कुंबळे यांनी ६१९ विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा क्रमांक लागतो. कपिल देव यांनी आतापर्यंत ४३४ विकेट्स मिळवल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आहे. हरभजनच्या नावावर ४१७ विकेट्स आहेत. अश्विन जर असाच फॉर्ममध्ये राहिला तर तो काही कसोटी सामन्यांमध्येच कपिल देव आणि हरभजन सिंग यांचा बळींचा विक्रम मोडू शकतो. पण त्याला कुंबळे यांचा विक्रम मोडण्यासाठी बराच काळ खेळावे लागेल. कारम अश्विन हा कुंबळे यांच्यापासून २१९ विकेट्स लांब आहे. पण अश्विनने यावेळी ३५ बळी मिळवले तर तो भारताचा सर्वाधिक विकेट्स मिळवणारा दुसरा क्रिकेटपटू ठरू शकतो. त्यामुळे अश्विन आता हा पराक्रम कधी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अश्विनने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या प्रत्येक कसोटी सामन्यांत अश्विनने अचूक आणि भेदक गोलंदाजी करत चांगली बळीही मिळवले आहेत. त्यामुळे आता अश्विन आपल्या कारकिर्दीत किती विकेट्स मिळवता, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aSgrKs

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...