अहमदाबाद, : तिसऱ्या कसोटी सामन्यातही पंचांचे निर्णय हे वादग्रस्त ठरले आणि त्यावर इंग्लंडचा संघ चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. त्यामुळे आता इंग्लंडच्या संघाने पंचांविरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल काल फलंदाजी करत होता. त्यावेळी गिलच्या बॅटला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस ब्रॉडचा एक चेंडू लागला आणि तो थेट बेन स्टोक्सच्या हातामध्ये विसावला. त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. त्यावेळी पंचदेखील या कॅचबाबत पूर्णपणे समहत नव्हते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. पण त्यापूर्वी 'सॉफ्ट डिसमिसल' या नियमानुसार पंचांनी गिलला बाद करण्याचा निर्णय दिला होता. त्यावेळी स्टोक्सने हा कॅच योग्यपद्धतीने पकडला आहे की नाही, हे तमैदानावरील पंचांना जाणून घ्यायचे होते. तिसऱ्या पंचांनी या कॅचचा रिप्लाय पाहिला आणि त्यांना वाटले की चेंडू हा मैदानावरील गवताला लागलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यावेळी गिलला बाद ठरवण्याचा निर्णय घेतला. या सर्व घटनेनंतर इंग्लंडचा संघ चांगलाच वैतागलेला पाहायला मिळाला. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स हे दोघेही नाखूष होते. त्यानंतर त्यांनी मैदानावरील पंचांबरोबर याबाबत वादही घातला. पण त्यावेळी मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील, असे म्हटले होते. पण रुटने यावेळी तुम्ही तर फलंदाजाला बाद दिले होते, अशी भूमिका घेतली होती. पण पंचांनी यावेळी ही गोष्ट ऐकली नाही. त्यानंतर भारताचा अर्धशतकवीर फलंदाज रोहित शर्माबाबतही इंग्लंडच्या संघाने स्टम्पिंगचे अपील केले होते. त्यावेळी मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला होता. ज्यावेळी स्टम्पवरील बेल्स उडवण्यात आल्या त्यावेळीच रोहित क्रीझमध्ये आल्याचे पाहायला मिळत होते. पण तिसऱ्या पंचांनी यावेळी दुसऱ्या कॅमेराच्या अँगलने ही गोष्ट चाचपडून पाहिली नाही. त्यामुळे क्रिकइन्फो या वृत्तवाहिनीनुसार इंग्लंडचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी याबाबत सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांची भेट घेतली आहे. जर इंग्लंडच्या संघाने पंचांविरुद्ध तक्रार केली असेल तर सामनाधिकारी याबाबत निर्णय घेऊ शकतात. त्यावेळी आयसीसीचे नियम नेमके काय सांगतात, हे पाहिल्यावर कारवाई करण्यात येऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aUHIMt
No comments:
Post a Comment