चेन्नई, : गेल्या काही वर्षांपासून चेतेश्वर पुजारा हा आयपीएलमध्ये दिसला नव्हता. पण गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये पुजाराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे या लिलावात पुजाराला एका संघाने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतल्याचे पाहायला मिळाले. पुजारा हा भारताच्या ट्वेन्टी-२० संघात नाही, त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटही तो खेळत नाही. पण तरीही कसोटी क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर पुजाराला यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात सामील करुन घेतले आहे. पुजाराची बेस प्राइज यावेळी ५० लाख रुपये होते. पुजाराला यावेळी आपल्या बेस प्राइजवरच चेन्नईने आपल्या संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे आता पुजारा आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. गेले बरीच वर्षे पुजारा मर्यादीत षटकांचे सामना भारताकडून खेळलेला नाही. तो फक्त कसोटी संघाचेच प्रतिनिधीत्व करताना दिसतो. पण आता धोनीच्या नेतृत्वाखाली पुजारा नेमकी कशी कामगिरी करतो आणि त्याच्या फलंदाजीमध्ये नेमका कोणात बदल होतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे पुजारासाठी ही एक चांगली संधी असेल. चेन्नईच्या संघाकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगचे या लिलावात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण चेन्नईच्या संघाने हरभजनला सोठचिठ्ठी दिली होती. त्यामुळे हरभजनचे या लिलावात काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. हरभजनसाठी यावेळी दोन कोटी रुपये एवढी बेस प्राइज ठेवण्यात आली होती. लिलावात हरभजनचे नाव उच्चारले गेले आणि त्याची बेस प्राइज यावेळी सांगण्यात आली. त्यानंतर काही संघांमध्ये यावेळी कुचबुज झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हरभजनचे नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हरभजनचे नाव घेतल्यावर काही संघ त्याच्याबाबत चर्चा करत होता. त्यावेळी हरभजनवर पहिली बोली कोण लावणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण .यावेळी हरभजनवर कोणीही बोली लावायला उत्सुक असल्याचे दिसले नाही. त्यामुळे या लिलावात हरभजन अनसोल्ड असल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3avY0en
No comments:
Post a Comment