नवी दिल्ली: इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव झाला. पण या सामन्यात इंग्लंडचा एक खेळाडूने शानदार कामगिरी केली. मोइन अलीने आठ विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात ४३ धावा केल्या. इंग्लंडचा भलेही या सामन्यात पराभव झाला आणि पुढील दोन कसोटीसाठी अलीचा संघात घेतले नसले तरी दुसऱ्या कसोटी सामन्यातील त्या दमदार कामगिरीचे बक्षिस त्याला मिळाले. आयपीएलच्या लिलावात मोइन अलीला बेस प्राइसच्या ३.५ पट अधिक किमत मिळाली. दोन कोटी बेस प्राइसच्या मोइन अलीला चेन्नई सुपर किंग्जने ७ कोटींना विकत घेतले. त्याला विकत घेण्यासाठी चेन्नई आणि पंजाब संघात चुरस झाली. मोइनला इतकी किमत मिळण्याचे कारण भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरी मानली जाते. त्याने प्रथम गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आणि मग १८ चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीत ५ षटकार आणि ३ चौकार मारले. अक्षर पटेलच्या एका ओव्हरमध्ये त्याने ३ षटकार मारले. त्याच्या या धमाकेदार फलंदाजीमुळेच लिलावात इतकी मोठी बोली लागल्याचे समजते. मोइन अलीने टी-२० क्रिकेटमध्ये १६७ सामन्यात ३ हजार ५१३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १४० इतका आहे. इतक नव्हे तर त्याच्या नावावर २ शतक आणि १९ अर्धशतक आहेत. टी-२० त्याने ११० विकेट घेतल्या असून ३४ धावात ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37Lf52n
No comments:
Post a Comment