Ads

Wednesday, February 10, 2021

IPL पेक्षा श्रीमंत टी-२० लीग सुरू होणार; हे असतील संघाचे मालक

नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत म्हणून भारतातील स्पर्धेकडे पाहिले जाते. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश सारख्या देशात टी-२० लीग स्पर्धा घेतल्या जातात. पण आयपीएल सारखे यश आणि लोकप्रियता अन्य लीग स्पर्धांना आली नाही. पण आता आयपीएलला मागे टाकणारी अशी एक स्पर्धा सुरू होणार आहे. वाचा- एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने गेल्या काही वर्षात टी-१० लीग स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. आता ECBने आयपीएलच्या धर्तीवर टी-२० लीग स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ECBने मंगळवारी याची घोषणा केली. बोर्डाचे चेअरमन आणि मंत्री शेख नहयान मुबारक अल नहयान यांनी ही माहिती दिली. वाचा- वाचा- युएईमध्ये होणाऱ्या या टी-२० लीग स्पर्धेसाठी क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांनी उत्सुकता दाखवली आहे. विशेषत: भारतातील काही उद्योगपती आणि बॉलिवूड स्टार यांच्यासह आयपीएलमध्ये सध्याच्या संघ मालकांनी युएईमध्ये होणाऱ्या या टी-२० लीग स्पर्धेतील संघ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोर्डाचे सचिव मुबाशिर उस्मानी यांनी सांगितले. या लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामात सहा संघ असतील. त्याचे शेअरधारक कोण असतील याचा निर्णय एका महिन्यात घेतला जाणार आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्डानुसार या टी-२० लीग स्पर्धेचा पहिला हंगाम या वर्षी होईल. डिसेंबर २०२१ ते जानेवाीर २०२२ या काळात पहिला हंगाम होण्याची शक्यता आहे. या लीगमध्ये जगभरातील क्रिकेटपटू सहभागी होण्याची आशा बोर्डाने व्यक्त केली. स्पर्धेचा स्तर आयपीएल इतका किंवा जगभरातील अन्य लीग स्पर्धेपेक्षा अधिक ठेवणार असल्याचे समजते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ryhhBw

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...