चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. रोहित शर्माच्या शानदार १६१ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडची दाणादाण उडवली. इंग्लंडचे ६ फलंदाज ८७ धावांवर बाद झालेत. वाचा- चेन्नई कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत असला तरी गोलंदाजीसाठी मैदानात उतरताना टीम इंडियाला एक मोठा झटका बसला. भारताचा स्टार फलंदाज () फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. वाचा- पुजारा संदर्भात बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पुजाराच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी त्याला फिल्डिंगसाठी मैदानावर न उतरवण्याचा निर्णय घेतला गेला. वाचा- भारतीय डावाची सुरुवात खराब झाली होती. शुभमन गिल डावाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पुजाराने २१ धावा केल्या. या दरम्यान त्याच्या डाव्या हाताला चेंडू लागला होता. तरी देखील तो मैदानावर थांबला. पुजाराच्या जागी आज मयांक अग्रवाल फिल्डिंगसाठी मैदानावर उतरला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील पुजाराला अशीच दुखापत झाली होती. ब्रिस्बेन मैदानावर झालेल्या अखेरच्या कसोटीत पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला होता. भारताच्या त्या ऐतिहासिक विजयात पुजाराने ५६ धावांचे योगदान दिले होते. वाचा- भारतीय संघाने रोहित शर्मा (१६१), अजिंक्य रहाणे (६७) आणि ऋषभ पंत (नाबाद ५८) यांच्या जोरावर पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. चार सामन्यांच्या कसोटीत इंग्लंडने १-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Othnfs
No comments:
Post a Comment