Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG : रिषभ पंतबरोबर इंग्लंडच्या खेळाडूंनी घेतला पंगा, व्हिडीओ झाला व्हायरल

चेन्नई, : भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतबरोबर इंग्लंडच्या खेळाडूंनी आज पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही पंतबरोबर अशाच काही गोष्टी घडल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीत पंत आणि बेन स्टोक्स यांच्यामध्ये शाब्दिक हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ही गोष्ट घडली ती ८७व्या षटकात. ज्यावेळी इंग्लंडने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारख्या स्थिरस्थावर झालेल्या खेळाडूंना बाद केले होते. त्यानंतर पंतचा मोठा अडसर त्यांच्या मार्गात असल्याचे पाहायला मिळत होते. त्यावेळी ८७व्या षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर पंत हा बॅटींगसाठी उत्सुक नसल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यापूर्वी स्लिपमध्ये उभा असलेल्या बेन स्टोक्सने त्याच्याबद्दल काही तरी टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी पंतने शब्द जरा जपून वापर, असे म्हटल्याचे व्हिडीओमध्ये ऐकायला मिळाले. पंत फलंदाजी करत नसल्याचे पाहिल्यावर स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंतने फलंदाजीला पुन्हा सुरुवात केली. त्या चेंडूनंतर पुन्हा एकदा पंतने पंचांकडे पाहिले आणि त्यानंतरच्या चेंडूवर पंतने एकेरी धाव घेतली. या एकेरी धावेसह पंतने आपल्याकडेच स्ट्राइक ठेवल्याचे पाहायला मिळाले. हे षटक संपल्यानंतर पंत हा पंचांबरोबर याबाबत चर्चा करत होता. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट यावेळी पंतशी बोलण्यासाठी आला. त्यावेळी दोघांमध्ये संवाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा पंतजवळ बेन स्टोक्स आल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी या दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहाला मिळाले. त्यावेळी पंचांनी पुन्हा एकदा या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी या दोघांमधील शाब्दिक युद्ध थंडावले. पण त्यानंतरही स्टोक्स तिथून हलला नाही. पंतच्या बाजूला उभा राहून तो चेंडू घासत होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो पंतकडे मोर्चा वळवणार, असे वाटत होते. पण त्यानंतर कोणतीही मोठी घटना घडली नाही. ही गोष्ट जेव्हा मैदानात सुरु होती तेव्हा प्रेक्षकांना हा प्रकार समजला होता. त्यामुळे प्रेक्षक यावेळी पंतच्या नावाने आरोळ्या देत होते. त्यामुळे पंत आता या गोष्टीचा बदला नेमका कसा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OzRVVQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...