चेन्नई: भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धमाकेदार दीडशतक झळकावले. रोहित द्विशतक करेल असे वाटत वाटत होते, पण तो १६१ धावांवर बाद झाला. रोहितने २३१ चेंडूत २ षटकार आणि १८ चौकारांसह १६१ धावा केल्या. रोहित आणि अजिंक्य जोडीने पाचव्या विकेटसाठी १६२ धावांची भागिदारी केली. या दीडशतकासह रोहितने काही विक्रम त्याच्या नावावर केले. वाचा- गेल्या काही दिवसात रोहितने मोठी खेळी केली नव्हती, त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती. पण आजच्या दीडशतकाने त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिले. रोहितचे शतक टीम इंडियासाठी देखील खास ठरले. कारण यावर्षात भारताकडून झालेले हे पहिलेच शतक ठरले आहे. रोहितचे हे करिअरमधील सातवे शतक तर इंग्लंडविरुद्धचे पहिले ठरले. वाचा- रोहितने या दीडशतकासह भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्करसह अन्य काही फलंदाजांच्या विक्रमाशी बरोबरी केली. हिटमॅनने करिअरमध्ये सलामीवीर म्हणून ११व्यांदा दीडशेपेक्षा अधिक धावा केल्या. याबाबत त्याने एलिस्टर कुक, सुनील गावस्कर आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहित्या आधी या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी ११ वेळा १५०हून अधिक धावा केल्या होत्या. वाचा- या यादीत सर्वात अव्वल स्थानी भारताचा विरेंद्र सेहेवाग आहे. त्याने १६ वेळा १५०हून अधिक धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ख्रिस गेल आहे. गेलने अशी कामगिरी १२ वेळा केली. रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या वेळा १५०हून अधिक धावा केल्यात. रोहितने ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशाने आणि जो रूट यांच्याशी बरोबरी केली. वाचा- भारताकडून कसोटीच्या पहिल्या ६० डावात सर्वाधिक वेळा १५०हून अधिक धावा करण्याबाबत रोहितने चेतेश्वर पुजारा आणि गौतम गंभीर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताकडून ६० डावात पुजारा आणि गंभीर यांनी प्रत्येकी चार वेळा १५०हून अधिक धावा केल्या होत्या. तर सेहेवागने ६ वेळी अशी कामगिरी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aXQfNk
No comments:
Post a Comment