चेन्नई, : भारताचा कर्णधार विराट कोहलीला आज मैदानातील पंचांनी एक वॉर्निंग दिल्याचे पाहायला मिळाले. कारण फलंदाजी करत असताना कोहलीकडून एक मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती लंचच्या एका षटकापूर्वी. त्यावेळी कोहली आणि अश्विन हे फलंदाजी करत होते आणि त्यांची जोडी चांगलीच जमलेली होती. पण यावेळी अश्विनबरोबर फलंदाजी करत असताना कोहली धावा घेत असताना त्याच्याकडून ही मोठी चुक घडली. त्यानंतर पंचांनी कोहलीला बोलावले आणि त्याला वॉर्निंग दिल्याचे पाहायला मिळाल. नेमकं घडलं तरी काय, पाहा... लंचच्या पूर्वीचे षटक इंग्लंडचा डॅनियल लॉरेंस टाकत होता. यावेळी अश्विनने ऑफ स्टम्पच्या बाहेर असलेला एक चेंडू तटवला. यावेळी कोहली आणि अश्विन यांनी तीन धावा घेतल्या. पण यावेळी तिसरी धाव घेत असताना कोहली हा खेळपट्टीवरुन धावत गेल्याचे पाहायला मिळाले. कोहली यावेळी लेग स्टम्पवरुन खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये आला. कोहली यावेळी लेग स्टम्पवरुन खेळपट्टीवर येऊन ऑफ स्टम्पच्या दिशेने धावत गेल्याचे पाहायला मिळाले. धावा घेत असताना किंवा गोलंदाजी झाल्यावर खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये जाणे ही मोठी चुक समजली जाते. कोहलीकडून ही मोठी चुक झाली होती. त्यावेळी पंचांनी कोहलीला बोलावले आणि त्याला पहिली वॉर्निंग दिल्याचे पाहायला मिळाले. पंचांनी वॉर्निंग दिल्यावर कोहली पंचांबरोबर वाद घालत असल्याचे पाहायला मिळाले. कोहली पंचांच्या या निर्णयानंतर नाराज झालेला पाहायला मिळाला. कारण आपण कोणती चुक केली आहे, असे कोहलीला वाटत नव्हते. पंचांबरोबर वाद घालून झाल्यावर कोहली हा स्लिपमध्ये उभा असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रुट याच्याकडे गेला. यावेळी कोहलीने रुटबरोबर काही वेळ संवाद साधला. कारण कोहली पंचांच्या निर्णयावर नाराज झाला होता. त्याचबरोबर आपली काही चुक नव्हती, हेच कोहली यावेळी रुटला सांगत असल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर काही वेळातच कोहली शांत झाला आणि कदाचित त्याला आपली चुक उमगली, असे काही जणांचे म्हणणे होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ajdbYk
No comments:
Post a Comment